उद्यापासून मुंबईच्या जंबो सेंटरमध्ये मिळणार मुलांसाठी कोविडची लस.
उद्यापासून मुंबईच्या जंबो सेंटरमध्ये मिळणार मुलांसाठी कोविडची लस.

सिद्धांत
२ जानेवारी २०२१: सोमवारपासून मुंबईत उभारलेल्या नऊ जंबो सेंटर्समध्ये शहरातील १५ ते १८ वयोगटातील सुमारे ९ लाखाहून जास्त मुलांचे लसीकरण सुरु होणार आहे. शहरातील ओमिक्रोनग्रस्त रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबईतील शालेय आणि महाविद्यालयीन मुलांचे लसीकरण जलद गतीने करता यावे यासाठी बीएमसी कडून प्रयत्न केले जाणार आहेत.

मुंबई महानगर पालिकेतर्फे रिचर्डसन फॅक्टरी -भायखळा, सोमय्या मैदान- मुलुंड, एनसीएसआय डोम- वरळी, नेस्को सेंटर – गोरेगाव (पूर्व), बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मालाड आणि मुलुंड(वेस्ट) या ठिकाणच्या जंबो सेंटरमध्ये लसीकरणाला उद्यापासून सुरु होत आहे.तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, परेल याठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटरसोबतच शहरातील काही खासगी हॉस्पिटलमध्ये मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे, पण या सेंटरमध्ये लसीच्या एका डोससाठी १२०० रुपये मोजावे लागणार आहेत.

या साऱ्या ठिकाणी होणारे लसीकरण हे पूर्णपणे मोफत असून सध्यातरी फक्त कोवॅक्सिन लस १५ ते १८ वयोगटातील मुलांना दिली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन स्लॉट बुकिंगसह वॉल्क-इन लसीकरणाची सोय उपलब्ध आहे. लसीकरणाला जाताना मुलांचे आधार कार्ड घेऊन जण आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

” या आठवड्यापासून जंबो सेंटरमध्ये लसीकरणाला मिळणार प्रतिसाद पाहून पुढे शहरातील कॉलेज आणि शाळांमध्ये सुद्धा लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत” असे अतिरिक्त कमिशनर सुरेश काकंनी यांनी वृत्तसंस्थांना माहिती देताना सांगितले. सध्याच्या घडीला बीएमसीतर्फे शहरात ४०० लसीकरण केंद्र चालवली जातात.

मुंबईतील आजची कोरोना रुग्णसंख्या.
मुंबईमध्ये आज कोरोनाचे ८०३६ नवे रुग्ण सापडले असून ५७८ रुग्ण कोरोनाचा यशस्वी उपचार घेऊन घरी परतले आहेत. शहरात सध्या २९८१९ ऍक्टिव्ह रुग्ण कोरोनाचा उपचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here