बेस्ट बस वाहकाला मारहाण, तिकीट मशीन हि फोडले, प्रवाशावर गुन्हा दाखल. गोरेगाव मुंबई येथील घटना.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी.
📞 7304654862 📞
मुंबई : बेस्ट बसच्या दरवाजाला वारंवार प्रवासी लटकत होता, त्याला जेंव्हा वाहकानी हटकले असता, त्या रागातून प्रवाशाने वाहकाला मारहाण सुरु केली, व त्यांच्याकडील चलो कंपनीचे तिकीट मशीन हि तोडल्याची घटना गोरेगाव पश्चिम येथे घडली. या प्रकरणी प्रवासी मनोज परिडा (44) याच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
तक्रारदार बेस्ट बस वाहक सतीश पालवे हे रात्री गोरेगाव स्टेशन वरून वरळी येथे निघालेल्या बस क्र. C33 वर ड्युटीवर होते, हि बस गोरेगाव पश्चिम रोड वरील जव्हाहर नगर थांब्यावर येताच, आरोपी मनोज परिडा बस च्या बाहेरच्या बाजूने पकडून दुसऱ्या हातात मोबाईल वर बोलत असल्याचे बघितले, बसचे वाहक पालवे यांनी त्याला बसमध्ये येऊन तिकीट काढायला सांगितले, त्या रागात आरोपी मनोज ने वाहक पालवे सोबत वाद घालण्यास व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाहक पालवे नी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला तरी, आरोपी मनोज ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो पालवेच्या अंगावर धावून जाऊ लागला दोघांच्या धक्काबुकीत वाहक पालवेच्या डाव्या हाताला दुखापत झाली. आणि त्यांनी त्वरित बस चालक तांबे यांना बस थांबवण्यास सांगितली. तोपर्यंत बस गोरेगाव आगारात पोहचली, आणि वाहक पालवे यांना आरोपी मनोज याने परत मारहाण सुरु केली. पालवेच्या हातातील तिकीट मशीन च पण नुकसान करण्यात आली, आरोपी मनोज ला सह प्रवाशांनी समजावण्याचे प्रयत्न केले तरीही तो कोणाचेच ऐकत नव्हता. नंतर वाहक पालवेनी पोलिसांची मदत घेतली. पोलीस घटनास्थळी पोहचून आरोपीला घेऊन ठाण्यात गेले, वाहक पालवेच्या हाताला दुखापत झाल्याने त्यांनी रुग्णालयात उपचार घेऊन आरोपीची ठाण्यात तक्रार नोंदवली.
वाहक पालवेच्या तक्रारीच्या आधारे बी एन एस कायध्याच्या कलम 352,324,(3),132 आणि 121(1)अंतर्गत आरोपी मनोज परिडा विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.