नि:शुल्क दंत तपासणी व चिकित्सा शिबीर संपन्न
वज्रदीप वेलफेयर रिसर्च फाऊँडेशन अमरावती व महाबोधि बुध्द विहार गौतम नगर पाच बंगला जुनी वस्ती बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमानाने
✒️ अमरावती जिल्हा प्रतिनिधी✒️
📱 8275348920
अमरावती :- वज्रदीप वेलफेयर रिसर्च फाऊँडेशन अमरावती व महाबोधि बुध्द विहार गौतम नगर पाच बंगला जुनी वस्ती बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 02/01/2025 नि:शुल्क दंत तपासणी व चिकित्सा शिबीर घेण्यात आले, या शिबिरामध्ये जीवक डेंटल क्लिनिक, प्रशांत नगर, अमरावती चे डॉक्टर अजय मेश्राम, दंत रोग तज्ञ व त्यांच्या दंतरोग तज्ञांच्या टीमने अनेक रुग्णांची दंत तपासणी व चिकित्सा केली, त्यांना औषधींचा वाटप करण्यात आलं व टूथपेस्ट चे वाटप करण्यात आले, सोबतच योग्य मार्ग दर्शन सुध्दा करण्यात आले या अनुशंगाने वज्रदीप वेलफेयर रिसर्च फाऊँडेशन अमरावती यांचे विश्वस्त व महाबोधि बुध्द विहार गौतम नगर पाच बंगला जुनी वस्ती बडनेरा येथील मित्र मंडळ यांचा सहकार्य लाभलं व त्यांनी शुभेच्छा दिल्या.