म्हसळ्यात गौणखनिज विरोधात मनसे आक्रमक शेतच कुंपण खात असल्याचा आरोप.
✒️नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8983248048
माणगाव : भारतात आपला कोकण सर्व संपन्न असून काही शासकीय अधिकाऱ्यांचा अधिकाराचा गैरवापरामुळे कोकणातील गौणसाठा काही वर्षात संपून जाईल या बाबत काही दुमत होत नाही. चिरगांव सारख्या गावात मोठ्या प्रमाणात विशष्ट जातींचे गिधाड पण आता नामशेष होण्याच्या मार्गांवर आहेत त्याच्या पण विचार केला पाहिजे.
तसेच तालुक्यात महसूल परवानगी आधीच खाणमालक खाणीत उत्खनन चालू करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडपणे होत आहे. सदर दगडखाण मालक परप्रांतीय मजूर आणून स्थानिक रोजगार बुडवत आहेत आणी स्थानिक लोकांच्या आणी शासनाच्या तोंडाला पान पुसत आहेत. तरी महसूल आणी तहसील मधून अश्या शासकीय कर्मचारी यांच्यावर कारवाई न केल्यास भ्रष्ट अधिकाऱ्याचे पुरावे जनतेसमोर आणू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलाय. आज या विषयावर म्हसळा तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार तेलेंगे यांची भेट घेतली त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष फैसलभाई पोपेरे, म्हसळा तालुका अध्यक्ष सौरभ गोरेगावकर, उप शहर अध्यक्ष राहुल काते, विद्यार्थी सेना अध्यक्ष शैलेश खोपकर,सुभाष कदम, अक्षय ठसाळ, समीर म्हशीलकर उपस्थित होते.