चंद्रपुरातील जनतेला 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची मागणी- आमदार किशोर भाऊ जोरगेवार
शहरातील पर्यटन स्थळांच्या विकासाला चालना देण्याची मागणी सभागृहात चंद्रपूर चे आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान केली.

Demand for free electricity to the people of Chandrapur up to 200 units – MLA Kishor Bhau Jorgewar
✒️मनोज खोब्रागडे✒️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर : – आज अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान सरकार तर्फे सादर केलेल्या मा. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावाला समर्थन देत चंद्रपुरातील विविध समस्यांना न्याय देण्याची मागणी सभागृहात केली तत्पूर्वी मा. राज्यपालांचे आभार मानले आणि पर्यावरण आणि पर्यटनमंत्री मा. ना. श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांना चंद्रपुरातील पर्यटन स्थळांना भेट देऊन यावर्षीच्या बजेट मध्ये वाढीव निधी देण्याची विनंती केली, चंद्रपुरातील जनता प्रदूषण युक्त वातावरणात राहून राज्याला वीज देण्यासाठी मोठा त्याग करीत आहे अशात शासनाने २०० युनिट पर्यंन्त वीज मोफत देण्याची मागणी पुन्हा एकदा सभागृहात केली सोबतच चंद्रपुरातील विविध समस्यांना शासनातर्फे न्याय देण्याची मागणी देखील या सभागृहात चंद्रपूर किशोर भाऊ जोरगेवार केली आहे.