धावपळीच्या जीवनात सामान्य आरोग्य चाचण्या महत्वाच्या-डॉ.मंगेश गुलवाडे

54

धावपळीच्या जीवनात सामान्य आरोग्य चाचण्या महत्वाच्या-डॉ.मंगेश गुलवाडे

इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे जनऔषधी सप्ताह निमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

General health tests are important in a fast paced life - Dr. Mangesh Gulwade
General health tests are important in a fast paced life – Dr. Mangesh Gulwade

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपुर, दि. 1 मार्च :- शहरातील इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे भारतीय जनऔषधी परियोजने अंतर्गत रक्तदाब तपासणी व मधुमेह तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी इंडियन रेडक्रॉस सोसायटी चे सचिव डॉ मंगेश गुलवाडे बोलत होते त्याप्रसंगी त्यांनी सांगितले की आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी दैनंदिन आरोग्य चाचण्या ह्या महत्वाच्या असून त्या नागरिकांनी काळजीपूर्वक कराव्यात,आज संपूर्ण जगाला कोरोना ने विळखा घातला आहे त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे तरी नागरिकांनी सतर्क राहून नियमित आरोग्य चाचण्या कराव्यात असे डॉ मंगेश गुलवाडे यांनी सामान्य नागरिकांना संदेश दिला. यावेळी डॉ.बी.एच दाभेरे, डॉ प्रफुल भास्करवार, विकास गेडाम, सुभाष मुरस्कर,प्रवीण चंदनखेडे,तेजस्विनी पडवेकर इत्यादींची उपस्थिती होती.