चंद्रपूर जिल्ह्यात नाफेडतर्फे चना खरेदी सुरू.

64

चंद्रपूर जिल्ह्यात नाफेडतर्फे चना खरेदी सुरू.

 NAFED starts buying gram in Chandrapur district.

NAFED starts buying gram in Chandrapur district.

✒️मनोज खोब्रागडे✒️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर,दि. 2 मार्च:- हंगाम 2020-21 मध्ये शासनाने चना खरेदीसाठी प्रति क्विंटल रुपये 5100 दर मंजूर केला आहे. चना खरेदीसाठी केंद्र शासनाने नाफेडची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली असून नाफेडच्या वतीने राज्यामध्ये पणन महासंघामार्फत चना खरेदी सुरू आहे. चना खरेदीच्या नोंदणीचा कालावधी 15 फेब्रुवारी 2020 पासून सुर झाला असून चना खरेदी 25 फेब्रुवारी ते 24 एप्रिल 2021 या कालावधीत करण्यात येणार आहे.

ज्या तालुक्यात खरेदी केंद्र सुरू नाही त्या तालुक्यांना खालीलप्रमाणे दिलेल्या खरेदी केंद्रावर तालुकानिहाय जोडण्यात आले आहे. चंद्रपूरसाठी भद्रावती, पोंभुर्णा, सावली व मुल, वरोरा खरेदी केंद्रासाठी वरोरा व भद्रावती, चिमुर खरेदी केंद्राला ब्रम्हपुरी, सिंदेवाही व नागभिड, गडचांदुर खरेदी केंद्राला कोरपना व जिवती, राजुरा खरेदी केंद्राला गोंडपिपरी व बल्लारपूर तालुके जोडण्यात आले आहेत.

तरी वरीलप्रमाणे दिलेल्या खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करणेसाठी आपले आधार कार्ड व्होटींग कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक इ. संपुर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जावून नोंदणी करावी व दिलेल्या मुदतीत संबंधीत खरेदी केद्रावर चना विक्री करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए.आर.गोगीरवार यांनी कळविले आहे.