पुयारदंड ग्राम पंचायत मध्ये २०१७ पासून ते २०२२ पर्यन्त पाच वर्षात दहा ग्रामसेवकांची बदली

पुयारदंड ग्राम पंचायत मध्ये २०१७ पासून ते २०२२ पर्यन्त पाच वर्षात दहा ग्रामसेवकांची बदली

पुयारदंड ग्राम पंचायत मध्ये २०१७ पासून ते २०२२ पर्यन्त पाच वर्षात दहा ग्रामसेवकांची बदली

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

भिसी :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की भिसी जवळील पुयारदंड ग्राम पंचायत मध्ये २०१७ पासून ते २०२२ पर्यन्त पाच वर्षात दहा ग्रामसेवकांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे, कोणत्याही ग्रामसेवकाला गावविकासाचा स्थायी विकास योजना राबविणे कठीण झालेले आहे. गांव विकासापासून खूप दुर आहे, असा आरोप पुयारदंड येथील तीनही ग्राम पंचायत सदस्यांनी चिमुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे केली आहे.ज्यांची नियमबाह्य कामे ग्रामसेवक करीत नाही, ज्यांच्या मर्जीप्रमाणे ग्रामसेवक ग्रा. पं. चा कारभार चालवत नाही ते असंतूष्ट ग्राम पंचायत सदस्य तथा पदाधिकारी वारंवार गटविकास अधिकारी व लोकप्रतिनिधीकडे ग्रामसेवकांच्या खोट्या तक्रारी करतात. असाच प्रकार पुयारदंड येथील कार्यरत ग्रामसेविका प्रतिभा कन्नाके यांच्या बाबतीत घडला. त्यांची तक्रार करण्यात आली, कुणी तक्रार केली म्हणून ते दोषी ठरवले जात नाही.तक्रारीची सखोलपणे चौकशी करून दोषी आढळल्यास अवश्य कार्यवाही करावी, अशी मागणी पुयारदंड येथील ग्राम पंचायत सदस्य विपुल शहाणे, तंटामुक्ती अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य धनराज बहादूरे, धनश्री बल्की यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी, गटविकास अधिकारी, यांना लेखी निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे.५ वर्षात १० ग्रामसेकांचा कार्यकाळ
११ जुलै २०१७ ते २५ फेब्रुवारी २०२२ पर्यन्त पुयारदंड ग्राम पंचायत मध्ये एल.आर. मिसाळ, डि. एच. मेश्राम, ए. बि. रामटेके, एम. डी मडावी, स्वाती बुरडे, पी.जी. कन्नाके, आर. के. मेश्राम, आंनद गलगले, पि.जि. कन्नाके ,जेश कांबळे, ( नविन नियुक्ती ) अशा दहा ग्रामसेवकांकडे पुयारदंड ग्राम पंचायतचा कारभार सोपविण्यात आला आहे. सरासरी दर सहा महिन्यांनंतर एक ग्रामसेवक पुयादंडचा कारभारी बनलेला आहे. असेच चालत राहिले तर सहा महिन्यात कोणता ग्रामसेवक गावाचा विकास करेल ? असा प्रश्नही ग्रामपंचायत सदस्यांनी अधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.