आज हिवरा येथे झालेला ट्रकचा अपघात म्हणजेच भविष्यात जीवित हाणी होण्याची श्यक्यता…… हिवरा गावातील वळण मार्गावर तात्काळ गतिरोधक,वळण भिंत, सिग्नल फलक द्यावे… हिवरा गावकऱ्यांची मागणी

आज हिवरा येथे झालेला ट्रकचा अपघात म्हणजेच भविष्यात जीवित हाणी होण्याची श्यक्यता……

हिवरा गावातील वळण मार्गावर तात्काळ गतिरोधक,वळण भिंत, सिग्नल फलक द्यावे…
हिवरा गावकऱ्यांची मागणी

आज हिवरा येथे झालेला ट्रकचा अपघात म्हणजेच भविष्यात जीवित हाणी होण्याची श्यक्यता...... हिवरा गावातील वळण मार्गावर तात्काळ गतिरोधक,वळण भिंत, सिग्नल फलक द्यावे... हिवरा गावकऱ्यांची मागणी

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- आज हिवरा गावातून राज्य महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने वळणावरून ती ट्रक सरळ बोरकुटे यांच्या विहिरीत जाता जाता वाचली. विहिरीच्या बाजूला मोठमोठे दगड असल्याने त्या दगडांनी ट्रकचालकाचे प्राण वाचवले व जीवित हानी टळली. यदाकदाचित त्या विहिरी जवळील दगडांवर दररोज कपडे धुणार्या महिला कपडे धुणी करतात.परंतु आजच्या अपघाती वेळेत तिथे कुठलीही कपडे धुणारी महिला नसल्याने खूप मोठी जीवित हानी टळली.परंतु भविष्यात अपघात होऊन जीवित हानी होण्यास नाकारता येत नाही.
सध्या या परिसरात राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. त्यातच भंगाराम तळोधी कडून येणारा डांबरी रस्ता हिवरा क्रॉसिंग पर्यंत पूर्णपणे झालेला आहे, त्यामुळे सध्या वाहतूक करणारे सर्व प्रकारची वाहने भरधाव सुसाट वेगात जातात. आणि हिवरा गावातून गेलेल्या या मार्गावर दोन ठिकाणी N प्रकारची वळणे असल्याने वाहन चालक कितीही सक्रिय असेल तरी परंतु या वळणांवर कधीही अपघात होऊ शकतो. हे आज झालेल्या अपघातातून कळून चुकले.
त्यामुळे यानंतर तरी असे अपघात टाळण्यासाठी या मार्गावर आत्यावश्याक ठिकाणी गतिरोधक व वळण भिंत, सिग्नल फलक तात्काळ लावण्यासाठी हिवरा गावातील समस्त नागरिकांची मागणी आहे.