महाराष्ट्र भूषण डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या जन्मशताब्दी अंतर्गत माणगांव शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले
विवेक काटोलकर
माणगांव शहर प्रतिनिधी
मो: 7798923192
माणगांव :-भारत देशाचे स्वच्छतादूत आदरणीय पद्मश्री डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने माणगाव येथे स्वच्छता अभियान बुधवार दि. 01मार्च रोजी स्वच्छता राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानामध्ये एकूण 2 ते 3 हजार श्रीसदस्यांनी सहभाग घेतला. या अभियानामध्ये बामणोली रोड, निजामपूर रोड कचेरी रोड, कालवा रोड शहरातील सरकारी कार्यालयांचे प्रांगण व शहरातील प्रमुख रस्ते, स्मशानभूमी, यांची साफसफाई करण्यात आली.
सकाळपासून डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी स्वच्छतेची साधने घेऊन साफसफाई केली. यामध्ये रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेले गवत, कचरा, प्लास्टिक बाटल्या उचलून शहराच्या स्वच्छतेचे काम स्वयंस्फूर्तीने व शिस्तबद्धपणे केले. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने संपूर्ण देशात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये आरोग्य शिबीर, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप, नैसर्गिक आपत्तीकालीन मदत, रक्तदान, धरणांतील गाळ काढणे, जलपुनर्रभरण इत्यादी उपक्रम सामाजिक बांधिलकी या नात्याने राबविले जातात. याच कार्याचा एक भाग म्हणून प्रात ऑफिस चे प्रांगण, माणगांव पोलिस स्टेशनचा परिसर, माणगांव बस स्थानक, मोर्बारोड महाराष्ट्र भूषण डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या जनसताब्दी निमित्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
भारत देशाचे स्वच्छतादूत आदरणीय पद्मश्री डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी याच्या जनसताब्दी बद्दल विविध उपक्रम माणगांव शहरात व इतर भागात राबविण्यात आले.