गुन्हेगारांवर बसविलेला वचक व धाक नवनियुक्त ठाणेदार सोनटक्के कायम राखतील का?
साहिल सैय्यद…..
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197
घुग्घुस :- औद्योगिक शहर हा मिनी इंडिया म्हणून प्रसिद्ध आहे तसाच गुन्हेगारी करिता देखील कुविख्यात आहे
मात्र शहरातील या गुन्हेगारीवर यापूर्वी असलेल्या पोलीस निरीक्षक आसिफराजा यांनी वचक बसविला होता त्यांच्या एक वर्षाच्या कालावधीत शहर जवळपास शांतच होता आता त्यांच्या जागी नवनियुक्त पोलीस निरीक्षक सोनटक्के यांच्यासमोर शहरातील गुन्हेगारी रोखने व शहरात शांतता प्रस्थापित करणे हा आव्हान राहणार आहे
शहरातील पोलिस ठाण्यात गुरुवार, २९ फेब्रुवारी रोजी नवनियुक्त ठाणेदार शाम सोनटक्के रुजू झाले.
यापूर्वी नागपूर गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले शाम सोनटक्के यांनी घुग्घुस पोलिस ठाण्याचा पदभार सांभाळला आहे.
ठाणेदार आसिफराजा शेख यांची नुकतीच बल्लारशाह येथे बदली झाली त्यामुळे सहा. पो. नि. प्रशांत साखरे यांची प्रभारी ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
जवळपास तीन आठवड्यानंतर ठाणेदार शाम सोनटक्के यांच्याकडे घुग्घुस पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.