भाजपा म्हसळा तालुका वतीने हळदी कुंकु समारंभ व महिला मेळावा संपन्न

भाजपा म्हसळा तालुका वतीने हळदी कुंकु समारंभ व महिला मेळावा संपन्न

भाजपा म्हसळा तालुका वतीने हळदी कुंकु समारंभ व महिला मेळावा संपन्न

भाजपा म्हसळा तालुका वतीने हळदी कुंकु समारंभ व महिला मेळावा संपन्न

✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा :- भाजपा म्हसळा तालुक्याच्या वतीने हळदी कुंकु समारंभ व महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता, या समारंभ ठिकाणी रा. जि. प. माजी सभापती निलिमाताई पाटील व भाजपा जिल्हा अध्यक्षा हेमाताई मानकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच महिला तालुका मोर्चा अध्यक्षा व पदाधिकारी यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना निलिमाताई यांनी स्री शक्ति कायदा व केन्द्र सरकार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना उज्वला योजना अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले, महिलांना विविध प्रकारच्या योजना अंतर्गत लाभ मिळत आहेत असे मेळाव्यात सांगितले, तसेच विविध योजना राबविण्यात येत आहेत, या मुळे खर्या अर्थाने महिलांना सन्मान मिळाले आहे असे देखील पाटील यांनी सांगितले, या हळदी कुंकु समारंभात काही महिलांनी उखाणे घेतले, या वेळी भाजपा म्हसळा तालुका महिला मोर्चा यांच्या कडून महिलांना हळदी कुंकु देऊन भेटवस्तू देण्यात आली, या मेळाव्याला महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला, तालुक्यातील अनेक महिला उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निमिषा ओक यांनी केले,तर प्रस्ताविक रेखा धारिया यांनी सादर,केले तसेच आभार अपर्णा ओक यांनी मांडले या कार्यक्रमात रा. जि. प. माजी सभापती निलिमाताई पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्षा हेमाताई मानकर, जिल्हा चिटणीस वैशाली मपारा,उपजिल्हा अध्यक्षा श्रेया कुंटे, सोशल मीडिया जि. संयोजक प्रियंका पिंपळे, ममता थोरे,अश्विनी खरे, दिप्ती नकाशे, तालुका अध्यक्षा रेखा धारिया,ता.सह.चिटणीस मोनिका कांबळे,अपर्णा ओक,ता.उपाध्यक्ष धनश्री मुंडे, शहर अध्यक्षा भाविका करडे, गौरी पोतदार, स्नेहल निजामपूरकर, सुषमा चांदोरकर. पुष्पा वाळवटकर.आदि महिला पदाधिकारी उपस्थित होते.