रायगड जिल्हा परिषद शाळा रेपोली येथे आठवडा बाजार संपन्न.

रायगड जिल्हा परिषद शाळा रेपोली येथे आठवडा बाजार संपन्न.

रायगड जिल्हा परिषद शाळा रेपोली येथे आठवडा बाजार संपन्न.

रायगड जिल्हा परिषद शाळा रेपोली येथे आठवडा बाजार संपन्न.

✒️ नंदकुमार चांदोरकर ✒️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 8983248048 📞

माणगाव : शुक्रवार दि.०१/०३/२०२४ रोजी रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा रेपोली येथे आठवडा बाजार व खाऊ गल्ली या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सदर उपक्रमाचे उदघाटन गोरेगाव बिटाचे विस्तार अधिकारी कुमार खामकर सर व शाळाव्यावस्थापन समितीचे अध्यक्ष कल्पेश पिसाळ आणि दत्तात्रय कडू यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आले. सदर उपक्रमात विद्यार्थ्यांना प्राप्त ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करता यावे ,त्यांनी तो अनुभव घ्यावा ,त्यासाठी पूर्वनियोजन काय असावे. भाजी किती विकावी म्हणजे आपला खर्च निघेल, १०० ग्राम पासून ते पाच किलो पर्यंत वजन योग्य कसे करावे , सुट्टे पैसे कसे द्यावेत पैशांचा व्यवहार कसा करावा या सर्व बाबींचा अनुभव मुलांनी घेतला. सदर कार्यक्रम प्रसंगी लोणेरे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री संजय खैरे सर , सुनिल अनकाडे सर , मोतीराम कुरे सर , राज कडू , नितिन सुर्वे सर ,श्रीम. चंदनशिवे मॅडम श्रीम. सूर्यवंशी मॅडम आदी शिक्षकवर्ग उपस्थित होते . तर सिद्धेश शिगवण , राजेश बंदुगडे जांबरे सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य .रेपोली ,भांदरे ,न्हवे येथील विद्यार्थ्यांचे पालकवर्ग व मोठ्या प्रमाणावर रेपोली येथील ग्रामस्थ उपस्थित होते . तसेच श्री रामदास ढमाल यांनी अत्यल्प मोबदला घेऊन भव्य मंडप बांधले होते . विद्यार्थी प्राप्त ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करत आहेत हे पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले. श्री.रत्नाकर महाले सर , श्रीम. संध्या जायभाये मॅडम , सुनिल गोरेगावकर सर जीवन तोरमल सर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूर्वनियोजना पासून ते शेवट पर्यंत खूप परिश्रम घेतले. श्री खामकर सरांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या . तर प्रत्यक्ष व्यवहारात विद्यार्थ्यांबरोबर संवादही साधला.विद्यार्थी स्वतः हिशोब करून व्यवहार करताना दिसत होते . रेपोली येथिल ग्रामस्थांच्या व महिला मंडळाच्या उदंड प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.