भगवान पगारे यांना पत्रकार क्षेत्रातील कार्यसन्मान पुरस्कार जाहीर

भगवान पगारे यांना पत्रकार क्षेत्रातील कार्यसन्मान पुरस्कार जाहीर

भगवान पगारे यांना पत्रकार क्षेत्रातील कार्यसन्मान पुरस्कार जाहीर

भगवान पगारे यांना पत्रकार क्षेत्रातील कार्यसन्मान पुरस्कार जाहीर

ज्ञानेश्वर तूपसुंदर
नाशिक तालुका प्रतिनिधी
मो. 8668413946

नाशिक : जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.) संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने यंदाही पत्रकारांना कार्यसन्मान पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यात डीडी न्यूज, दूरदर्शनचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी भगवान पगारे यांना हा पुरस्कार जाहीर झाला. पत्रकार भगवान पगारे यांनी पत्रकारितेच्या गेल्या २६ वर्षात शैक्षणिक, आरोग्य, कृषी, विज्ञान, क्रीडा, सामाजिक, राजकीय अश्या विविध क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि महत्त्वकांक्षी मेहनतीने देश हितासाठी जनतेच्या न्यायिक दृष्टीने पत्रकारितेच्या माध्यमातून उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा आज रविवार (दि. ३) सकाळी १० वाजता नाशिकरोड येथील के. जे. मेहता हायस्कूलमध्ये होणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस दिनेश ठोंबरे, तालुकाध्यक्ष करणसिंग बावरी, कार्याध्यक्ष लियाकत पठाण व इतर पदाधिकाऱ्यांनी दिली.

पत्रकारांसह अधिकारी तसेच समाजोपयोगी उपक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही गौरव केला जाणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.