कच्चे मास लपवून ठेवल्या प्रकरणी दोघांना अटक
त्रिशा राऊत क्राइम रिपोर्टर नागपुर
मो.9096817953
भिवापुर.दक्षिण उमरेड प्रादेशिक वन विभाग अंतर्गत भिवापूर तालुक्यातील चारगाव येथे हरणाची शिकार कच्चे मास लपवून ठेवल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी वनविभागाच्या पथकाने तालुक्यातील चारगाव येथील एका घरातून हरणाच्या कच्च्या मांसासह एक भरमार बंदुक जा केली ही कारवाई एक मार्च शनिवारला रात्री नऊ वाजताच्या सुमारास करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार दक्षिण उमरेड प्रादेशिक वनविभागाअंतर्गत तालुक्यातील चारगाव येथे हरणाची शिकार करून कच्चे मांस लपवून ठेवल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र
अधिकारी कोमल गजरे यांना मिळाली होती त्यांनी बोटेझरी आणि उमरेड न उपवनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह मोठ्या शिताफीने सापळा रचत आरोपीच्या घराची झडती घेतली दरम्यान घरातील एका भांड्यामध्ये हरणाचे कच्चे मांस आढळले यासह आरोपीच्या घरातून एक भरमार बंदुकही जप्त करण्यात आली वन्यप्राण्यांची शिकार प्रकरणी विवीध कलमांन्वये गुन्हा नोंदवित दोन्ही आरोपींना अटक करण्यात उपवनसंरक्षक मनोज धनविजय यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल गजरे पी टी कामडी डी टी चौधरी पी.एस वैदय वाय टी ठवकर ए एच सहारे जी एस सहारे आरठवकर ए एच सहारे जी एस सहारे आर पी लांजेवार आर एस भांबोळे डी. आर नेहते यांनी ही कारवाई केली.