वेकोलीच्या क्षेत्रीय योजना अधिकारी पुलय्या वर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा.
आशा घटे आत्महत्या प्रकरणी राजुरा तेली समाजाची मागणी.
संतोष मेश्राम
राजुरा तालुका प्रतिनिधी
राजुरा (ता.प्र.) 1 एप्रिल:- स्वर्गीय आशा तुळशीराम घटे वय वर्षे १९ हिला आत्महत्येला प्रवृत्त केल्यामुळे व तिने त्या कारणामुळे आत्महत्या केल्यामुळे गैरअर्जदारावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करून गैरअर्जदारास सेवेतून बडतर्फ करण्याबाबत तक्रार अर्ज / निवेदन तेली समाज राजुरा च्या वतीने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे यांना देण्यात आले.
सास्ती येथील मय्यत कु. आशा तुळशिराम घटे यांच्या वडीलाची शेती वे.को.ली. मार्फत संपादीत करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मय्यत कु. आशा घटे ही वेकोली मार्फत लाभार्थी असल्यामुळे तिच्या नौकरीसाठी मय्यत ही तिचे नातेवाईका सोबत धोपटाळा येथील वेकोली कार्यालयात दि. २२ रोजी नौकरीसाठीचे सर्व दस्ताऐवज घेवून गेली होती. नौकरीबाबतचे वेकोली कडील काम हे गैरअर्जदार करतात. त्यादिवशी गैरअर्जदार जी. पुलय्या यांनी मय्यत कु. आशा घटे हिला अपमानास्पद वागणुक दिली व त्यामुळे मय्यत कु. आशा घटे हिच्या मनावर परिणाम झाला व त्याकारणामुळे तिने सास्ती येथे घरी येवून गैरअर्जदाराने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे विष प्राशन केले. त्यानंतर दि. ३१ रोजी तिचे चंद्रपूर येथे दुखद निधन झाले.
मय्यत कु. आशा घटे यांच्या परीवारातील सदस्यांनी गैरअर्जदाराचे विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार राजुरा पोलीसांनी गैरजर्जदाराचे विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही.
गैरअर्जदाराने कु. आशा तुळशिराम घटे हिला मनस्ताप दिलेला असून तिचेवर दबाव टाकलेला होता व वाईट वागणुक दिली व त्यामुळे गैरअर्जदाराचे या कृत्यामुळे कु. आशा तुळशिराम घटे हिने आत्महत्या केलेली असून गैरअर्जदाराने आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा केलेला आहे. त्यामुळे त्याचेवर त्वरित कारवाई होणे आवश्यक झालेले आहे.
पिडीत मय्यत आशा घटे ही तेली समाजाची युवती असल्यामुळे तिला व तिच्या परिवारातील लोकांना न्याय मिळावा म्हणून समाजबांधव या नात्याने तेली समाजाचे वतीने प्रस्तुत लेखी तकार तसेच निवेदन दाखल करण्यात येत आहे. करीता लेखी तकार करण्यात येत आहे अशी माहिती दिली आहे. या निवेदनाची प्रतिलिपी कोळसा मंत्री भारत सरकार नई दिल्ली, विजय वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर, बाळुभाऊ धानोरकर खासदार चंद्रपूर, सुभाष धोटे आमदार राजुरा, जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधिक्षक चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी राजुरा, तहसिलदार राजुरा, उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा आदींना समस्त तेली समाज राजुराचे वतीने देण्यात आले.