रानडुकरांने केला जबरदस्त हल्ला त्यात एक इसम गंभीररित्या जखमी जखमीला पुढील उपचारासाठी गोंडपिपरी येथे दाखल

रानडुकरांने केला जबरदस्त हल्ला त्यात एक इसम गंभीररित्या जखमी

जखमीला पुढील उपचारासाठी
गोंडपिपरी येथे दाखल

रानडुकरांने केला जबरदस्त हल्ला त्यात एक इसम गंभीररित्या जखमी जखमीला पुढील उपचारासाठी गोंडपिपरी येथे दाखल

भिमराव देठे
भं तळोधी प्रतिनिधी
मो नं 8999223480

‌ ‌गोंडपिपरी : गोंडपिपरी येथून गणेशपिपरी हे अंतर 4 कि.मी. अंतरावर आहे, गोंडपिपरी व गणेशपिपरीच्या मधोमध बाहेर हा धक्कादायक प्रकार घडल्याची बातमी 1एप्रिल रात्री 8 वाजता घडली त्यात सिद्धार्थ मोतीराम दुर्गे वय 42 वर्ष रा.चेकदरूर त. गोंडपिपरी जि.चंद्रपूर येथील इसम हा गंभीर रित्या जखमी झाला. सिद्धार्थ दुर्गे हा तहसिल कार्यालय गोंडपिपरी येथे लिपीक मनुन कार्यरत आहेत. तो आपल्या गावकडे चेकदरूर परत दुचाकी वाहनाने येतांना त्यातच रानडुकरांचा कळप त्यात 12 ते15 रानडुकरांचा समावेश होता. असे तो सांगितल्याचे वृत्त समोर आले त्यातच तो रानडुकरांचा संपूर्ण कळप त्यातील 2 रानडुकरांने दुचाकी वाहनाला जोरदार धडक देऊन आदळले. व तो तिथेच गंभीर रित्या अवस्थेत पडून होता त्यांच्या डोक्याला व पायाला जोरदार मार बसला त्यानंतर दशरथ बोरकुटे विलास खेडेकार ,संजय वाघाडे, दुर्योधन राऊत. इत्यादी व्यक्तीने त्याला फार मोठे सहकार्य केलेत माणूस कीच्या नात्याने, या सर्व व्यक्तीनी ताबडतोब ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथून रुग्णावाहीका बोलवण्यात आली. व त्याना ग्रामीण रुग्णालयात गोंडपिपरी येथे तुरंत हालवण्यात आले.