वर्तमान निवडणुक ही वैयक्तिक पक्ष व उमेदवाराची नाही, देशातील लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. – मा. रविकांत बोपचे. तिरोडा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नियोजन बैठकीत तालुका कार्यकारणी जाहीर..!

वर्तमान निवडणुक ही वैयक्तिक पक्ष व उमेदवाराची नाही, देशातील लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. - मा. रविकांत बोपचे. तिरोडा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नियोजन बैठकीत तालुका कार्यकारणी जाहीर..!

वर्तमान निवडणुक ही वैयक्तिक पक्ष व उमेदवाराची नाही, देशातील लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. – मा. रविकांत बोपचे.

तिरोडा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नियोजन बैठकीत तालुका कार्यकारणी जाहीर..!

वर्तमान निवडणुक ही वैयक्तिक पक्ष व उमेदवाराची नाही, देशातील लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. - मा. रविकांत बोपचे. तिरोडा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नियोजन बैठकीत तालुका कार्यकारणी जाहीर..!

प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
मो.9834486558

गोंदिया – तिरोडा
काल आदिवासी सांस्कृतिक भवन तिरोडा येथे भंडारा- गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विस्तारीत नियोजन बैठक युवा नेते मा. रविकांत खुशाल बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका अध्यक्ष मा. हेमराज अंबुले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी श्री रविकांत बोपचे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ही निवडणूक कोणा एका व्यक्तीच्या विरोधात नाही तर ही निवडणूक लोकशाही वाचवण्याची व संविधानाच्या संरक्षणासाठीची महत्वपूर्ण लढाई आहे
देशात मागिल दहा वर्षापासून राज्यघटना व लोकशाहीला विरोध करणारी सरकार आहे त्यांना उखडून फेकण्याची ही शेवटची संधी आहे, त्यामुळे आपण सर्वांनी
सर्व शक्तीनिशी निवडणुकीत हिरहिरीने भाग घेत महाविकास (INDIA) आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ प्रशांत यादवराव पडोळे यांना विजयी करण्यासाठी मेहनत घेत योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले.

यासह सदर बैठकीत तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारणी खालील प्रमाणे-
जिल्हा अध्यक्ष, अनुसुचित जमाती सेल – शामराव उईके
तालुका उपाध्यक्ष – महेशकुमार नकुल कुकडे, मोनिष सतीसेवक, तुंडीलाल दसाराम शरणागत
तालुका महासचिव – तानाजी (गणेश) कुसोबा रहांगडाले,
सशिष बंसोड , संजय प्रभुदास रहांगडाले, रामलाल सितकुरा बाळणे
तालुका सचिव – राजेंद्र बेनिराम पटले, जयचंद टोइराम बिसेन
तालुका संघटक – जितेंद्र भैय्यालाल बिसेन, किशोर कुंभरे
तालुका अध्यक्ष, अनुसुचित जमाती सेल- भोजराज उईके
शहर अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस – टीपू सय्यद
शहर उपाध्यक्ष – विजय बुध्दे
शहर सचिव – आशिष येरपुडे
उपरोक्त आदींना नियुक्ती पत्र देत भावी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी श्री रविकांत खुशाल बोपचे याच्यासोबत सर्वश्री तालुका अध्यक्ष हेमराज अंबुले, जिल्हा अध्यक्ष अनुसुचित जमाती सेल शामराव उईके, महिला जिल्हा उपाध्यक्ष चंदाताई शर्मा, महिला तालुका अध्यक्ष भाग्यश्री केलवतकर, शहर अध्यक्ष रवींद्र(पिंटू) वंजारी, कार्याध्यक्ष रजनीकांत शरणागत, तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय सेल केतन रामटेके, महिला तालुका कार्याध्यक्ष छायाताई टेकाम, उपाध्यक्ष सकुनताई बोबडे, महासचिव मंदाताई टेंभरे, मुन्ना उपवंशी, युवक जिल्हा उपाध्यक्ष भवानीसिंह बैस, युवक जिल्हा महासचिव रोहित पटले, सरपंच रवींद्र भगत आदिंसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.