मानसिक लवचिकता म्हणजेच येणाऱ्या परिस्थितीला किंवा संकटाला भावनिक व मानसिकदृष्ट्या संयमाने सामोरे जाण्याची मनाची क्षमता.

✍️ नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 8983248048 📞

माणगाव : मानसिक लवचिकता म्हणजेच येणाऱ्या परिस्थितीला किंवा संकटाला भावनिक व मानसिकदृष्ट्या संयमाने सामोरे जाण्याची मनाची क्षमता होय.यालाच आपण भावनिक किंवा मनाची लवचिकता असेही म्हणू शकतो. मानसिक लवचिकता हा नातेसंबंधांवर परिणाम करणारा अतिशय महत्वपूर्ण घटक आहे.मानसिक लवचिकता जितकी जास्त तितकी त्या व्यक्तीमध्ये स्वीकार करण्याची,क्षमा करण्याची क्षमता जास्त असते. याउलट मानसिक लवचिकता नसेल तर अशा व्यक्तींची तडजोड करण्याची इच्छा असेल तरी त्यांचं मन मात्र त्यांना साथ देत नाही.अशा व्यक्तींना नातेसंबधांची उपयुक्तता समजत नाही असे नसते.त्यांना माफ करायचे नसते असेही नसते.किंवा त्यांना समोरच्या व्यक्तींच्या भावना ,वेदना समजत नाहीत असेही नसते.पण केवळ मानसिक लवचिकतेच्या अभावामुळे
इच्छा असूनही ती व्यक्ती पूर्णपणे क्षमा करण्यास मनाने तयार नसते.अशावेळी दोघांपैकी एकाने हळुवार व संयमाने घेणे गरजेचे असते .पण हळुवार आणि संयमाने घ्यावे हे बोलायला सोपे असले तरी कार्यवाही करत असताना नेहमी एकालाच तडजोड करावी लागत असेल तर मात्र सहनशीलतेला ही मर्यादा येतेच.म्हणूनच मानसिक लवचिकता हवीच!
व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत शारीरिक विकासाबरोबरच मानसिक लवचिकतेचे विकसन होणे अत्यावश्यक आहे.ही प्रक्रिया आनुवंशिकता, सभोवताल,सामाजिक – आर्थिक परिस्थिती,व्यक्तीचे अनुभव विश्व यावर ,वातावरण इत्यादी घटकांवर अवलंबून असली तरी सामाजिक व कौटुंबिक समतोल राखण्यासाठी योगासने,प्राणायाम ,ध्यानधारणा ,आत्मचिंतन यांच्या माध्यमातून प्रयत्नपूर्वक मनाच्या लवचिकतेच्या कक्षा रुंदावता येतात.

लेखिका
संगीता सूरशेट्टे नाचपल्ले
प्रा.शिक्षिका
रा.जि .प.शाळा चांदोरे