सावंगी येथे मादी पट्टेरी तडस्याचा दुर्दैवी मृत्यू
✍️मीडिया वार्ता वृत्तसेवा ✍️
मो 8999904994
गडचिरोली : वडसा येथील सावंगी भागात तडस हा प्राणी मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळताच हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी चंद्रपूर चे दिनेश खाटे यांनी हि माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वडसा के.आर. धोंडाने (प्रादेशिक) यांना देण्यात दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, तत्परता दाखवत लगेच त्यांनी घटनास्थळ गाठून शहानिशा केली असता तडस हा सुकलेल्या छोट्या कालव्यामध्ये नियतक्षेत्र एकलपूर कक्ष क्रमांक. ८८२ मध्ये मृतावस्थेत आढळून आला, १-२ दिवसाअगोदर त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज लावण्यात आला .
क्षेत्र सहाय्यक कराडे व वनरक्षक रामटेके यांनी घटनास्थळी उईके विद्यालय ,सावंगी येथे ही शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना विचारपूस केली असता , त्यांना हा तडस २-३ दिवसाअगोदर शेतामध्ये बसून असल्याचे आढळले व त्याची प्रकृती ठीक नसल्याने तो एका ठिकाणी बसून आढळला होता.असे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले.
दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेल्या भारतामध्ये पट्टेरी तरस (Striped Hyena) ही एक वन्यजीव प्रजाती आहे, अनुसूची १ मध्ये त्याला संरक्षण प्राप्त झाले असून, ज्याला शास्त्रीय भाषेत ‘हायना हायना’ म्हणतात.हा निशाचर प्राणी असल्याने हे रात्रीच अन्नाच्या शोधात बाहेर पडतात, आणि दिवसभर गुहेत आराम करतात , या प्राण्याचे शरीर करडसर आणि पिवळसर रंगाचे असून, त्यावर काळ्या रंगाचे उभे पट्टे असतात. या प्राण्याची लांबी 100-130 सेंटीमीटर आणि शेपटी 25-40 सेंटीमीटर असते. प्रजनन काळ हा जानेवारी-फेब्रुवारी मध्ये असतो ,हे मुख्यत्वे मृत प्राणी खातात, ज्यामुळे ते कुजणाऱ्या प्राण्यांपासून होणारे रोग रोखण्यात मदत करण्यात मुख्य भूमिका बजावणारा वन्यप्राणी आहे. पट्टेरी तरस हे निसर्गातील एक महत्त्वाचे घटक आहेत, जे मृत प्राण्यांचे व्यवस्थापन करतात. नैसर्गिक अधिवासात ते साधारणपणे 12 वर्षे आणि प्राणीसंग्रहालयात 20 वर्षे जगू शकतात. पट्टेरी तडसचा अधिवास दिवसेंदिवस कमी होत असल्याने,तडस आता दिसेनासे झाले आहे ,पण गडचिरोली शहराजवळ ,धानोरा,कुरखेडा,पोर्ला,वडसा व जिल्ह्यात अनेक भागात बऱ्या प्रमाणात तडस्याचे अस्तिव टिकून असल्याचे हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी चे दिनेश खाटे यांनी सांगितले .
घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी नंदेश्वर यांनी पाहणी केली असता, प्रकृतीमध्ये बिघाड झाला असावा असा अंदाज बांधला. तडस्याचे संपूर्ण शरीराचे अवयव शाबूत असून,पुर्नवाढ झालेल्या मादी पट्टेरी तडस असल्याचे आढळून आले, व पुढील तपासणी साठी तडस्याचे नमुने फॉरेन्सिक साठी पाठवण्यात आले .घटनास्थळी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी चे दिनेश खाटे,अमित देशमुख,प्रसाद चट्टे वनपरिक्षेत्र अधिकारी वडसा के.आर. धोंडाने (प्रादेशिक), क्षेत्र सहाय्यक के.वाय. कराडे,वनरक्षक एस .एस. रामटेके ,बायॉलॉजिस्ट हर्षद रहांगडाले व वनविभागाचे वनमजूर उपस्थित होते .