तिलारी घाटातून बंद असलेली प्रवाशी एस टी बस अखेर सुरू
स्वराज्य सरपंच सेवा संघटना जिल्हाध्यक्ष प्रविण गवस व सहकाऱ्यांच्या आंदोलनाला यश…
✍️दत्ताराम देसाई ✍️
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
📞94056 94122📞
सिंधुदुर्ग :-दोडामार्ग तालुक्याला व बेळगाव, कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा सर्वात लगतचा मार्ग म्हणजे तिलारी घाट या मार्गे अनेक वर्षा पासुन एसटी बस सुरू होत्या पण गेल्या वर्षी पावसाळ्यात जून महिन्यात संरक्षक भिंत तुटल्यामुळे एस टी महामंडळाच्या सर्व बस फेऱ्या बंद पडल्या होत्या त्या आजपर्यंत देखील बंदच होत्या.या बसेस पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण गवस , सामाजिक कार्यकर्ते अंकुश गावडे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश गवस, राजन गावडे, दत्ताराम देसाई, नागेश दळवी सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी स्थानिक ग्रामस्थाना बरोबर घेवून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रोजी उपोषण केले व तिलारी नगर येथे रास्ता रोको करण्यात आला,याची दखल घेतं सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी घाटातील दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेऊन एक ते दीड महिन्यात काम पूर्ण केले, त्यांनतर वाहतूक विभाग कोल्हापूर यांनी घाटाची पाहणी केली. त्याचा अहवाल सादर करून तसे पत्र वाहतूक नियंत्रक विभाग कोल्हापूर यांच्याकडून आगार व्यवस्थापक कोल्हापूर यांना मिळाले आहे. त्यामुळे कोल्हापूर आगाराची लाल परी तिलारी घाटातून धावली यातील पहिली एस टी बस कोल्हापूर दोडामार्ग पणजी बस सकाळी 7 वाजता कोल्हापूर येथून सुटली व 11.30 वाजतां कोदाळी येथे आगमन झाले त्यानंतर त्या ठिकाणी ड्रायव्हर कंडक्टर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी उपस्थित प्रवीण गवस यांनी सर्व ग्रामस्थांचे व प्रशासनाचे आभार मानले व एसटीच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे अंकुश गवस अंकुश गावडे दत्ताराम देसाई राजन गावडे आम्ही देसाई भाऊसाहेब देसाई सचिन देसाई निघू दळवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. एसटी बस सुरू झाल्यामुळे शाळकरी मुलांचे तसेच कोल्हापूर गोव्याला जाणाऱ्या प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. चंदगड विधानसभेचे आमदार मा. शिवाजीराव पाटील साहेब यांचे एसटी बस सुरू होण्यासाठी विशेष सहकार्य लाभले. बद्दल सर्व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले व यानंतर एसटी बस पुढील प्रवासासाठी पणजी येथे रवाना झाली.