मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचा मुदखेड तालुक्यात दौरा

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचा मुदखेड तालुक्यात दौरा

पंचायत समितीसह बारड, नागेली व डोंगरगावला भेट

Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025

मनोज एल खोब्रागडे
✍️सह संपादक✍️
मो 9860020016

नांदेड : – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आज मुदखेड तालुक्यातील बारड, नागेली व डोंगरगाव येथे दौरा करुन ग्रामस्‍थाशी संवाद साधला. बारड येथे त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला सतेच घरकुल बांधकामाला गती देण्याच्या सूचना केल्या. यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर विहीर तसेच 4 लाख 20 हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाची पाहणी केली. सध्या जुन्या योजनेतून पाणीपुरवठा होत असून, नव्याने सुरू झालेल्या योजनेव्‍दारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचनाही मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली त्यांनी दिल्या.

ग्रामस्तरावर ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी सेग्रीगेशन शेड उभारण्याचे तसेच गावातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचे निर्देशही मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिल्‍या. गावात स्‍वच्‍छतेसाठी जनजागृती वाढविण्यासाठी विशेष मोहिमा राबवाव्यात, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बारडच्या सरपंच मंगलताई बुरडे, उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. रावसाहेब, उप कार्यकारी अभियंता वाडीकर, वेरूळकर, ग्राम पंचायत अधिकारी अनुप श्रीवास्तव, कंत्राटदार काझी, दिगंबर टिप्परसे, भगवान पुयड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीयसहाय्यक शुभम तेलेवार उपस्थित होते.

पंचायत समितीला आकस्मिक भेट

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी मुदखेड पंचायत समितीला अचानक भेट देऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती व कामकाजाचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना तसेच अन्य योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी गटविकास अधिकारी एस. एच. बळदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.