वाघाच्या हल्ल्यात बैल ठार
त्रिशा राऊत नागपुर क्राइम रिपोर्टर मो 9096817953
उमरेड.(बेला)
गावाजवळील खुर्सापार शिवारात बेला येथील सरपंच अरूण बालपांडे यांच्या स्वतःच्या शेतात पट्टेदार वाघाने बैलाची शिकार केल्याची घटना घडली. शेतात गाई, वासरं, बैल असे ३० जनावरे बांधून असताना वाघाने एका बैलावर झडप घालून बैलाला काही अंतरापर्यंत फरकडत नेवून ठार केले तर काही जनावरे दावे तोडून सैरावरा पळून गेले ठार केलेल्या बैलाची किंमत अंदाजे ३० ते ४० हजाराच्या आसपास आहे खुर्सापार परिसरात वाघाच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे वनविभागाला वारंवार सुचना दिल्या असून सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी एफजी राठोड यांनी पंचनामा केला परिसरात चार कॅमेरे ट्रॅप लावण्यात आहे आहेत आणि परिसरात वाघाची दहशत असल्यामुळे शेतकरी शेतमजूर यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे