रायगड जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.भारत बाष्टेवाड यांची बदली.
श्रीमती नेहा भोसले, भा .प्र.से. रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग :- रायगड जिल्हा परिषदेत झालेल्या ५ कोटी ३५ लाख ३४ हजार ७७१ रुपयांचा वेतन घोटाळ्याची चौकशी पोलिसांमार्फत सुरू असतानाच रायगड जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.भारत बाष्टेवाड यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी श्रीमती नेहा भोसले, भा .प्र.से. यांची रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना तत्काळ कार्यभार स्वीकारण्याचे आदेश शासनाने पारित केले आहेत.
डॉ.भारत बाष्टेवाड हे रायगड येथे दिनांक २४-०७-२०२३ रोजी रुजू झाले होते. रायगड येथील कारकिर्दीची दोन वर्षे पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली करण्यात आल्याने जिल्ह्यामध्ये सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे.
व्ही. राधा अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी
सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, यांचेकडील आदेश दिनांक:-०१.०४.२०२५ अन्वये श्रीमती नेहा भोसले, भाप्रसे. यांची नियुक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड या पदावर डॉ. भारत बास्टेवाड, भाप्रसे यांच्या जागी केली आहे. श्रीमती भोसले यांनी नवीन पदाचा कार्यभार डॉ. बास्टेवाड, भाप्रसे यांच्याकडून त्वरित स्वीकारावा असे आदेशीत केले आहे.
डॉ. भारत बास्टेवाड, भाप्रसे यांना नागपूर येथे रोजगार हमी योजना आयुक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.