मिशन धारावी; भारतीय जैन संघटनेकडून विविध संस्था, मंडळे, प्रशासन यांचा सन्मानचिन्ह देऊन अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते गौरव

58

मिशन धारावी; भारतीय जैन संघटनेकडून विविध संस्था, मंडळे, प्रशासन यांचा सन्मानचिन्ह देऊन अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते गौरव

मिशन धारावी; भारतीय जैन संघटनेकडून विविध संस्था, मंडळे, प्रशासन यांचा सन्मानचिन्ह देऊन अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते गौरव
मिशन धारावी; भारतीय जैन संघटनेकडून विविध संस्था, मंडळे, प्रशासन यांचा सन्मानचिन्ह देऊन अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते गौरव

नीलम खरत,मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई/धारावी:- भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून धारावीत राबवत असलेल्या माझी धारावी माझी जबाबदारी, मिशन लसीकरण मोहिमेची पाहणी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककांनी यांनी केली. यावेळी ज्या सामाजिक संघटनांनी या उपक्रमाला सहाय्य केले त्यांचा सन्मान श्री गणेश विद्या मंदिर, धारावी या ठिकाणी मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककांनी यांच्या तसेच भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था (भाऊ) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला.

यावेळी किरण दिघावकर (सहाय्यक आयुक्त मुंबई महानगरपालिका जी/नॉर्थ), डॉ. विरेंद्र मोहिते (आरोग्य अधिकारी, मुंबई महानगरपालिका), गुलाब पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक धारावी पोलीस ठाणे), विलास गंगावणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहू नगर पोलीस ठाणे) आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे होणारी गैरसोय, त्यांना लागणारी मदत आणि विशेष करून मागील वेळी धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट असताना मनपाच्या आणि शासनाच्या सहकार्याने भारतीय जैन संघटना सर्व तयारीनिशी मैदानात उतरून कोरोनाबाबत विविध माध्यमातून जनजागृती करत आहे. तसेच जनतेने ही मास्कचा वापर करणे, हात स्वच्छ धुणे, आणि महत्वाचे म्हणजे सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे.असे मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककांनी यांनी सर्व उपस्थितांना सांगितले.

यावेळी प्रमुख व्यक्त्यांनी देखील धारावी मिशन, लसीकरण तसेच माझी धारावी माझी जबाबदारी याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी खालील मान्यवर संस्थांचा व संस्था प्रमुख यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. राजेश खंदारे सरचिटणीस श्री गणेश विद्या मंदिर, प्रशांत व्हटकर धारावी प्रमुख – द आर्ट ऑफ लिव्हिंग, रमेश जैन-अध्यक्ष माहीम धारावी मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन, मरियम मॅडम प्रमुख – शेड सामाजिक संस्था, सुरेश जैन श्री धारावी राजस्थान जैन संघ, डॉ. शेख अख्तर
धारावी आयुष डॉक्टर असोसिएशन, बाल मुरगण नायडूकम- तुगेदर फौंडेशन, रोसलीन मॅडम
स्नेहा संस्था, संजय धुमाळ-श्री विठ्ठल रखुमाई मंदिर कमेटी, खुर्शीद शेख-अध्यक्ष – पिवळा बंगला मस्जिद,जाफर करीयानिया-भागर कठिया ज्ञाती समाज, दिगंबर कोळी-धारावी कोळी जमात, नसीर खान-ट्रस्टी – तोहबिया मस्जिद, सलिम शेख-अध्यक्ष – गौसी जीलानी मस्जिद, विलास बागडे- अध्यक्ष – खांबदेव तरुण मित्र मंडळ कार्यक्रमाची प्रस्तावना व माहिती भारतीय जैन संघटनेचे मुंबई सरचिटणीस राहुल नाहटा यांनी दिली. आभार प्रकल्प अधिकारी अशोक पवार यांनी तर सूत्रसंचालन संतोष लिंबोरे यांनी केले.