वर्धा जिल्हातील समुद्रपुर तालुक्यात सापडला आई आणि मुलीचा कुजलेले मृतदेह.

✒मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
वर्धा,दि.2 मे:- वर्धा जिल्हातील समुद्रपुर तलुक्यातुन एक खळबळजनक बातमी समोर आली. त्यामूळे सर्वीकडे हयहय व्यक्त करण्यात येत आहे. समुद्रपुर तालुक्यातील सावंगी (झाडे) येथे रविवारी दि.2 ला सकाळीच्या सुमारास एका बंद घरात दोन महिलाचे कुजलेल्या अवस्थेत मृत्यूदेह आढळून आले. कुजलेल्या मृत्यूदेहाची दुर्गंधी आल्याने हा प्रकार लक्षात आला. सुभद्रा डोमाजी मांडवकर वय 80 वर्ष व सुरेखा हरिश्चंद्र पाचखंडे वय 45 वर्ष असे मृतक आई, मुलीचे नावे आहेत.

मृतक आई व मुलगी परीवारा पासून वेगळ्या राहत होत्या, मृत मुलगी सुरेखाची प्रकृती चांगली नव्हती. या दोघी माय लेकी काही दिवसांअगोदर हिंगणघाटवरून दवाखान्यातुन आल्या होत्या. मात्र, त्या नंतर त्या बाहेर दिसल्या नाही. रविवारी त्या घरातुन दुर्गंधी येत होती मृतक महिलेची सुन जिजाबाई प्रकाश मांडवकर हि मृतक महिलेच्या घरी जाऊन पाहिले असता, दोघींचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळले. तिने घरील सदस्यांना व गावकऱ्यांना याविषयी सांगितले. उपसरपंच अजय कुडे व पोलिस पाटील समीर धोटे यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

सदर महिला शेतमजूरी करुन स्वतःचा उदरनिर्वाह करित होत्या. मुलगी सुरेखा सात -आठ वर्षापासून आजारी होती. त्यांचा मृत्यु नेमका कशामुळे झाला ह्याचे कारण अस्पष्ट असून सध्या कोरोना काळात आरोग्य कर्मचारी प्रत्येक गावात जाऊन तपासणी करते सोबतच आशा वर्कर प्रत्येक रुग्णावर लक्ष ठेवून असते मात्र या ठिकाणी कोणाचेही कसे लक्ष गेले नाही असा प्रश्न विचारला जात आहे पुढील तपास ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात धनंजय पांडे, अमोल पुरी करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here