वर्धा जिल्हातील दहेगाव येथील युवा शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या.

वर्धा जिल्हातील दहेगाव येथील युवा शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या.
वर्धा जिल्हातील दहेगाव येथील युवा शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या.

आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी✒
वर्धा,दि.2मे:- वर्धा जिल्हातील दहेगाव येथील युवा शेतकऱ्याने केळापूर शिवारातील विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारच्या सकाळी 9 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दहेगाव (गावंडे) येथील युवा शेतकरी विशाल हनुमंत कासारे वय 28 वर्ष हा शनिवारच्या सकाळी 7 वाजता केळापूर शिवारात असलेल्या शेतात गेला आणि लगतच्या प्रभाकर भोयर केळापूर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली यामुळे गावावर शोककळा पसरली. सकाळची वेळ असल्याने शेतात काम करणारे शेतकरी या विहिरीवर पाणी पिण्यासाठी आले असता सदर घटना त्यांच्या लक्षात आली. या घटनेची माहिती विशालच्या नातेवाईकांना देण्यात आली, व पुलगाव पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व शव पुलगावच्या रुग्णालयात हलविण्यात आले.
  
विशालकडे अडीच एकर शेत आहे. शेती करण्यासाठी त्याने 2008 साली सोसायटीच्या मद्यमातून 17 हजार रुपये कर्ज उचलले होते. पण नापिकी मुळे कर्जाची परतफेड होऊ शकली नाही,यामुळे त्याला आतापर्यंत सावकार कडून कर्ज घेऊन शेती करावी लागत होती. या वर्षी  शेतीचा लागवड खर्चही निघाला नाही, यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा. अडीच एकर शेताच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने तो गवंडी कामावर मजुरीसाठी जात होता. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे गवंडी कामला लागणारे साहित्य वेळेवर मिळत नसल्यामुळे परिणामी बांधकाम बंद राहत आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, आजारी बहिणीचा उपचार कसा करावा या विवनचेनेत असतांना शेवटी त्याने मृत्यूला कवटाळले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here