बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्या मुळे दुर्गापूर त्रस्त
हेमा मेश्राम
दुर्गापूर प्रतिनिधी
मो.न.9356653707
दुर्गापूर:- चंद्रपूर पासून पाच की.मी. अंतरावर असलेल्या दुर्गापूर ला बिबट्याचे व अन्य जंगली प्राण्यांचे वाढती जीव हानी बघून दुर्गापूर वासी त्रस्त. दिनांक ०१/०५/२०२२ ला रात्री 11.30 च्या सुमारास वॉर्ड न.३ ला एक ४५ वर्षीय महिला गीता मेश्राम ही आपल्या राहत्या घरी जेवण करून बाहेर बसली असता बिबट्यांनी तिला उचलून फरकटत घेऊन गेला व तिचा त्या हल्ल्यात जागीच जीव गेला.मागील काही महीन्या पासून दुर्गापूर ला बिबट्याचे व पट्टेदार वाघाचे दहशत खूप जास्त वाढले आहे आणि या काही महिन्यांमधे प्रतीक,राज सारख्या मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे मागील जीव हानी बघून त्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद केले होते तरी सुध्धा परत हे हल्ले बघून दुर्गापूर वासी चिंतेत आहे. अश्या वाढत्या जीव हानी मूळे वनविभाग का लक्ष देत नाही या मुळे दुर्गापूर नागरिक भडकले आहेत.