कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने हिंदुस्तान यार्ड व सवेरा इंडिया मधील कामगारांना पगारवाढ.

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने हिंदुस्तान यार्ड व सवेरा इंडिया मधील कामगारांना पगारवाढ.

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने हिंदुस्तान यार्ड व सवेरा इंडिया मधील कामगारांना पगारवाढ.

✍विठ्ठल ममताबादे ✍
उरण तालुका प्रतिनिधी
मो. नं.9702751098

उरण (रायगड):-
कामगार नेते महेंद्र घरत अध्यक्ष असलेल्या न्यु मॅरीटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांना सातत्याने न्याय देण्याचे व सन्मानाने जगण्याचे काम होत आहे. कामगार नेते महेंद्र घरत हे राजकारणाबरोबरच कामगार क्षेत्रातही आपल्या नेतृत्वाने कामगारांना सातत्याने न्याय देत असतात. शेलघर येथील कार्यालयात सवेरा इंडिया प्रा. लि. तळोजा व हिंदुस्तान यार्ड धुतुम या कंपनीतील कामगारांसाठी एकाच दिवशी दोन पगारवाढीचे करार करण्यात आले. सवेरा इंडिया या कंपनीतील कामगारांना तीन वर्षांसाठी ८१०० रुपये पगार वाढ करण्यात आली. तर हिंदुस्तान यार्ड धुतुम मधील कामगारांसाठी ५००० रुपये पगारवाढ करण्यात आले.

या करारनाम्या प्रसंगी न्यु मॅरीटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पी. के. रामण, सरचिटणीस वैभव पाटील तर सवेरा इंडियाचे ऑपरेशनल मॅनेजर अजय पवार, कामगारांतर्फे संदीप म्हात्रे, हरी पाटील, आत्माराम पाटील, सुभाष तांडेल, विनोद बारशे, रोशन भोईर, भरत बोडके तसेच हिंदुस्तान यार्ड चे डायरेक्टर जितेंद्र सिग, कामगारांतर्फे अरुण पाटील, करण ठाकूर, साईनाथ ठाकूर, किसान ठाकूर, बळीराम फोफेरकर, नारायण ठाकूर, राम ठाकूर, गणेश ठाकूर आदि उपस्थित होते.कामगार वर्गांना न्याय मिळाल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे.