पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतासाठी वरदान – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन ‘मन की बात’च्या शतकपूर्तीनिमीत्त कार्यक्रमाला उपस्थिती.प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमातेचे पूजन

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर, ३० एप्रिल: देश मेरा परिवार है’ असे म्हणत कन्याकुमारी ते काश्मीर आणि कामरूख ते कच्छपर्यंत जात-पात-धर्म न बघता ‘मन की बात जन जन के साथ’ या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याचा अद्भूत कार्यक्रम देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला. असा कार्यक्रम जगातील कोणत्याही देशाच्या पंतप्रधानाने किंवा राष्ट्राध्यक्षाने राबविला नाही. ब्रीटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेयर यांनी तर ‘एक सूर्य, एक चंद्र, एक पृथ्वी आणि एक नेता… नरेंद्र मोदी’ या शब्दांत पंतप्रधानांचा गौरव केला आहे. असे नेतृत्व भारताला लाभणे हे आपले भाग्य आहे. खरे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईश्वराने भारताला दिलेले वरदान होय, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मन की बात’ची आज शतकपूर्ती झाली. त्यानिमित्ताने ‘मन की बात’ मध्ये उल्लेख झालेल्या जिल्ह्यातील कर्तृत्ववान मंडळींचा सत्कार करण्यात आला. यावेळी भागवताचार्य मनीष महाराज आणि चंद्रपूर महानगरचे भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

भारतमातेच्या पुजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या पुजनाने करावी अशी सुचना मुनगंटीवार यांनी मांडली. ते पुढे म्हणाले, ‘देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक खंबीर नेतृत्व मिळाले आहे. देश १५ ऑगस्ट २०४७ च्या दिशेने वाटचाल करीत असताना या अमृत काळातील वाटचालीत आपल्या देशासाठी निःस्‍वार्थपणे काम करणारे हे नेतृत्व आहे. ‘सबका साथ सबका विकास… सबका प्रयास सबका सन्मान’ या भावनेने काम करणारे ते जगातील एकमेव नेते आहेत.’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्भुत कार्य केले. जगात कुणालाही जे सुचले नसेल ते त्यांना सुचलं. मन की बात, चाय पे चर्चा, परीक्षा पे चर्चा यासारखे उपक्रम जगात कुणालाही सूचले नाहीत, असेही ते म्हणाले. देशाच्या बाहेरही नरेंद्र मोदींचीच चर्चा असल्याचेही त्यांनी उदाहरणासह सांगितले. ते म्हणाले, ‘गेल्या आठवड्यात मी इंडोनेशियाला गेलो होतो. तिथे सर्वत्र देशगौरव नरेंद्र मोदींचे कौतुक होताना दिसले. त्यांनी सुरू केलेली ‘मन की बात’ जगातील अनेक देशांमध्ये ऐकली जाते. काही देशांनी ‘मन की बात’चे भाषांतर सुध्‍दा केले आहे. आपल्याही देशातील जनतेमध्ये राष्ट्रप्रेमाची ऊर्जा निर्माण करण्यासाठी, राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी त्यांना ‘मन की बात’ प्रेरणादायी वाटते. त्यामुळे नरेंद्र मोदी आता भारताच्या सीमेपर्यंत मर्यादित राहिलेले व्यक्तिमत्त्व नाही तर ते विश्वगौरव आहेत.’ तत्पूर्वी, महानगर भाजपच्या वतीने मुनगंटीवार यांना बांबूपासून तयार केलेला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची लाकडी प्रतिमा असलेला ‘मन की बात’चा रेडियो भेट दिला.

 

‘मन की बात’मध्ये चंद्रपूर

 

देशात साडेसातशेहून अधिक जिल्हे आहेत. पण यातील चंद्रपूर जिल्ह्याचा ‘मन की बात’मध्ये तीनवेळा उल्लेख झाला. देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरची दखल घेतली. पहिला उल्लेख वृक्षलागवडीचा झाला. त्यानंतर इको-प्रोचे प्रमुख बंडू धोत्रे व त्यांच्या टीमचा आणि तिसरा उल्लेख एव्हरेस्टवर २९ हजार २९ फुटाच्या उंचीवर जाऊन झेंडा रोवणाऱ्या आमच्या १७-१८ वर्षांच्या आदिवासी विद्यार्थ्यांचा झाला. त्यासाठी पंतप्रधानांचे मी मनःपूर्वक आभार मानतो, असे मुनगंटीवार म्हणाले. ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी गौरविलेल्या मंडळींचा व संस्थांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

 

जे करायचे ते हटके

जे काम करायचे ते हटके झाले पाहिजे, असा आपला प्रयत्न असल्याचे वनमंत्री म्हणाले. मागच्या टर्ममध्ये मी माझं कार्यालय देशातलं पहिलं आयएसओ कार्यालय करण्याचा निर्णय घेतला आणि यशस्वी करून दाखवला. २ हजार ५५० चौरस किलोमीटर ग्रीन कव्हर वाढल्यावर वृक्षलागवडीवर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाने शिक्कामोर्तब केले आणि कौतुकही केले. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या गर्भगृहाच्या बांधकामासाठी चंद्रपुरातील काष्ठ पाठवले. तिथे अयोध्येत प्रत्येकाच्या ओठावर चंद्रपूरचे नाव आहे, असे वनमंत्री म्हणाले.

जगदंब तलवार आणि वाघनखे

आता छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखे परत आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केले, पण दुर्दैवाने अपयश आले. माझ्या सुदैवाने, ग्रेट ब्रिटनने अलीकडेच एक कायदा केला असून त्यानुसार दुसऱ्या देशाच्या ऊर्जा देणाऱ्या वस्तू कर्ज तत्वावर देता येईल, असे नव्या कायद्यात म्हटले आहे. त्यामुळे आता ३५०व्या शिवराज्याभिषेक समारोहात जगदंबा तलवार व वाघनखे आणण्याची संधी आपल्याला मिळत आहे, याचा मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला. त्याचवेळी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन ऐश्‍वर्या भालेराव यांनी केले तर आभार डॉ. दिपक भट्टाचार्य यांनी केले. काष्‍ठपूजन शोभायात्रेदरम्‍यान अनेक स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आले होते. मन की बात या कार्यक्रमानंतर या सर्व स्‍पर्धांचे बक्षिस वितरण करण्‍यात आले. यामध्‍ये वेशभूषा, रांगोळी या व विविध स्‍पर्धांचा समावेश होता. अनेक शाळांनी यामध्‍ये हिरीरीने भाग घेतला होता. यातील काही शाळांनी यात बक्षिसे पटकाविली. भाग घेणा-या स्‍पर्धांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी मुनगंटीवार यांची पश्चिम क्षेत्र सांस्‍कृतीक मंडळाच्‍या अध्‍यक्षपदी नियुक्‍ती झाल्‍याबद्दल अनेक संस्‍थांनी त्‍यांचा सत्‍कार केला. या कार्यक्रमाचे संचालन दिवाकर पुद्दटवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here