भाजप देणार माथेरान मधील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्हॅली क्रॉसिंगच्या माध्यमातून रोजगाराची संधी….
✍🏻श्वेता शिंदे ✍🏻
माथेरान, शहर प्रतिनिधी
मो.8793831051
माथेरान :- माथेरान हे जागतिक दर्जाचे मुंबई-पुणे पासून जवळ असलेले थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी दरवर्षी देश विदेशातून लाखोच्या संख्येने पर्यटक येत असतात. माथेरान मध्ये 38 प्रेक्षणिय स्थळे असून, दोन उद्याने आहेत, लहान मुलांचे आकर्षण म्हणजे माथेरानची झुकझुक गाडी, माथेरानमध्ये कोणतेही कारखाने, कंपन्या,शेती नसून पर्यटन हाच येथील मुख्य व्यवसाय आहे, पर्यटकांच्या मनोरंजनासाठी काहीतरी वेगळे आकर्षण असावे म्हणून येथील काही महत्वाच्या पॉईंट्सवर कायदेशीर परवानगी घेऊन साहसी खेळ (व्हॅली क्रॉसिंग )करण्यासाठी गेली 4 ते 5 वर्षापासून केंद्रशासन व राज्यशासन यांच्या दरबारीं प्रयत्न सुरु होते.याला आता लवकरच यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून कायदेशीर परवानगी देखील मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
माथेरानमधील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या अटी शर्ती न घालता आणि कुठल्याही प्रकारचे ‘राजकारण’ न करता कायमस्वरूपी कायदेशीर मंजुरी घेऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी माथेरान भाजप शहर प्रयत्नशील आहे.
स्थानिक निवडणुकांचे वेध लागले की येथील राजकीय मंडळी रोजगाराची आमिषे दाखवून तरुणांना आपल्याकडे वळून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा खोट्या भूल थापांना येथील तरुणवर्ग देखील बळी पडत असतात. मात्र येथील वनविभागाकडून जो पर्यंत कायदेशीर परवानगी मिळत नाही तो पर्यंत अशा कोणत्याही साहसी खेळांना परवानगी दिली जाणार नाही. यासाठी मध्यंतरी दिल्ली येथे जाऊन माथेरान भाजप पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन येथील पर्यटनाला चालना मिळण्या करिता तसेच माथेरानच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय निर्मितीच्या उद्देशाने व्हॅली क्रॉसिंग सारख्या सहासी खेळांना पर्यावरण विभागाकडून रीतसर परवानगी मिळण्याकरीता निवेदन दिले होते.तर मध्यंतरी पनवेल येथील दौऱ्या दरम्यान देखील पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबत भाजप शहर शिष्ट मंडळाची सदर विषया संदर्भात चर्चा देखील करण्यात आली होती. याच अनुषंगाने लवकरच येत्या काही दिवसात माथेरान मध्ये सहासी खेळांना प्राधान्य देण्याकरीता माथेरान वन विभाग व्हॅली क्रॉसिंगला अधिकृत परवानगी देणार असल्याची चर्चा होत आहे.केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना निवेदन सादर करताना माथेरान भाजप शहराध्यक्ष प्रवीण सकपाळ, उपाध्यक्ष किरण चौधरी, माजी नगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी नगरसेवक प्रदीप घावरे, व माथेरान व्यापारी असोशिशन अध्यक्ष राजेश चौधरी उपस्थित होते.