गुजरात येथील डॉ. मोईज मेघराजीया व राजस्थान येथील डॉ. कर्नल प्रमोद कुमार हे शुक्रवारी (ता.२) कपील नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल
✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098
नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर महानगरपालिकेच्या आशीनगर झोन मधील कपील नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांचे राष्ट्रीय स्तरावरील चमूकडून मूल्यांकन करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाकडून गठीत समितीतील सदस्य गुजरात येथील डॉ. मोईज मेघराजीया व राजस्थान येथील डॉ. कर्नल प्रमोद कुमार हे शुक्रवारी (ता.२) कपील नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. या दोन सदस्यीय समितीकडून शुक्रवारी आणि शनिवारी राष्ट्रीय गुणवत्ता मूल्यांकन मानकांनुसार (एनक्यूएएस) तपासणी करुन मूल्यांकन केले जाईल.
शुक्रवारी (ता.२) कपील नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मनपाद्वारे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे, शहर गुणवत्ता समन्वयक डॉ. राजेश बुरे, कपील नगर केंद्राच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरीश सायमा, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी सहारे, डॉ. शकील अहमद, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक आदी उपस्थित होते.