आदिवासी बांधवांच्या ताब्यातील जागा बळकावण्याचा प्रयत्न

आदिवासी बांधवांच्या ताब्यातील जागा बळकावण्याचा प्रयत्न

आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली एफआयआर दाखल करण्याची मागणी

आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी हिराकोट परिसरात लाक्षणिक उपोषण

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील सागरवाडी माची परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी सरकारकडून सुरू असलेल्या जमिनीच्या मोजणीविरोधात तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे…या शेतकऱ्यांचे म्हणण्यानुसार आमच्या तीन पिढ्या या जमिनीवर शेती करत आहेत.ही जमीन आमची आहे, आम्हाला तिथून हटविण्याचा कुठलाही अधिकार सरकारला नाही आदिवासींच्या ताब्यातील जमीन सुकुमार भगत व मनोज पाटील व अन्य व्यक्तीच्या परस्पररित्या मोजणी करुन बळकावत आहेत. त्या संदर्भात रितसर तक्रार पोयनाड पोलीस स्टेशन येथे दाखल केलेली होती.परंतु सदर तक्रारीचा योग्यरित्या तपास न होता पी.एस.आय. आर.डी. म्हात्रे,यांनी आमचे अर्ज निकाली काढलेले आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांवर अन्याय झाला आहे…यासंदर्भात पोयनाड पोलीस स्टेशनचेपी.एस.आय.आर.डी.म्हात्रे,यांची चौकशी होवून निलंबित करण्यासाठी १ मे महाराष्ट्र दिनी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत अलिबाग हिराकोट तलाव येथे लाक्षणिक उपोषण केले या उपोषणादरम्यान आदिवासी बांधवांनी संबंधीत आरोपींवर अॅट्रोसिटीज अॅक्ट खाली एफ.आय. आर. दाखल करावा आणि आदिवासी बांधवाच्या ताब्यातील दळी जमीनीचा ताबा, कबजा, वहिवाट कायम रहावी तसेच त्यांच्या ताब्यातील क्षेत्राची महसूल खात्यामार्फत योग्यरित्या पंचनामे होऊन सरकार दप्तरी लेखी नोंद होऊन ७/१२ मिळावा अशी मागणी उपोषण दरम्यान करण्यात आली.
या वेळी अँड, अजय उपाध्ये,अँड. जान्हवी उपाध्ये,दीपक नाईक,सुदाम नाईक,सुमन नाईक हे उपोषणास बसले होते .

सर्वसामान्यांच्या समस्या, सर्व सामान्यांचे प्रश्न

सर्वसामान्यांच्या बातम्यांनाच, आम्ही देतो महत्त्व

आज आपल्या विश्वासाबरोबरच मीडिया वार्ता न्यूजला गरज आहे, आपल्या मदतीची. आपली छोटीशी मदत या फेक न्यूजच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या बातम्यांना वाचा फोडून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लाखमोलाची ठरू शकते.