अलिबागमध्ये 39 इमारती धोकादायक
चार शासकीय कार्यालयासह वसाहतीची समावेश
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग शहरातील 39 इमारती धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये चार शासकीय इमारत व कर्मचारी वसाहतींचा समावेश आहे. अलिबाग नगरपरिषदेकडून नोटीस देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
अलिबाग हे पर्यटनाबरोबर ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरामध्ये काही खासगी व शासकीय इमारती खूपच जून्या आहेत. पावसाळा सुरु होण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अतिवृष्टीमध्ये जून्या इमारतींची पडझड होण्याची भिती कायमच असते. अतिवृष्टीमध्ये झालेल्या पडझडीमध्ये जीवीत व वित्तहानी होऊ नये, म्हणून अलिबाग नगरपरिषदेने शहरातील इमारतींची माहिती घेण्यात आली. त्यामध्ये 14 इमारती धोकादायक आणि 25 इमारती अतिधोकादायक असल्याची माहिती समोर आली. धोकादायक इमारतीमध्ये 13 खासगी व एक शासकीय इमारतीचा समावेश आहे. अलिबागमधील राज्य उत्पादन शुल्क विभागाची इमारत धोकादायक आहे. या इमारतीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारभार चालत होता. या ठिकाणी नवीन इमारत उभारण्याच्या हालचाली झाल्या होत्या. परंतु, शासकीय अडथळयामुळे इमारत बांधणीचे काम लांबणीवर गेले आहे. त्यामुळे सध्या राज्य उत्पादन शुल्क विभाग गोंधळपाडा येथील एका जागेत कार्यरत आहे.
अतिधोकादायक इमारतीमध्ये 22 खासगी व तीन शासकीय इमारतींचा समावेश आहे. अलिबागमधील जिल्हा पोस्ट कार्यालयाच्या मागील जागेत जागेत कर्मचारी वसाहतीची इमारत 40 वर्षाहून अधिक जूनी आहे. ती इमारत जीर्ण झाली आहे. पुर्णतः मोडकळीस आली आहे. परंतु, शासनाकडून ही इमारत बांधण्यासाठी कोणतीही हालचाल नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अलिबागमधील तलाठी कार्यालायच्या मागील बाजूला कर्मचारी वसाहत आहे. ही इमारतदेखील जीर्ण झाली आहे. तसेच जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारतदेखील जीर्ण झाली आहे. या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्याची हालचाल सुरु आहे. त्यामुळे संध्या जिल्हा परिषदेचा कारभार कुंटेबाग येथून चालत आहे. जीर्ण झालेल्या इमारतीच्या जागी नवीन सात मजली इमारत बांधली जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. परंतु, त्याला कधी मुहूर्त कधी लागणार असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.
सर्वसामान्यांच्या समस्या, सर्व सामान्यांचे प्रश्न
सर्वसामान्यांच्या बातम्यांनाच, आम्ही देतो महत्त्व
आज आपल्या विश्वासाबरोबरच मीडिया वार्ता न्यूजला गरज आहे, आपल्या मदतीची. आपली छोटीशी मदत या फेक न्यूजच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या बातम्यांना वाचा फोडून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लाखमोलाची ठरू शकते.