भिवंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागणीला यश, रोडचा कामाला सुरुवात.

अभिजित सपकाळ, भिवंडी प्रतिनिधी ✒
मुंबई/भिवंडी:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष भगवानजी टावरे व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे भिवंडी शहर सचिव ऐड. कादर वडगामा यांच्या अथक परिश्रमांने भिवंडी प्रभाग समिती क्रमांक 05 च्या अंतर्गत बागेफिरदॉस मस्जिदच्या मागे अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम ना दुरुस्ती अवस्थेत होते. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून रस्त्याची अवस्था खूप बिकट होती. तसेच नागरिकांना येण्या-जाण्याकरीता खूप त्रास सहन करावा लागत होता. असे असताना स्थानिक राहवाशानी वॉर्डातील नगरसेवक यांना वारंवार तक्रारी देऊन सुद्धा नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत राहिले व अद्यापर्यंत त्याचे निवारण झाले नाही. असे असताना स्थानिक रहिवाशांनी याची कल्पना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी यांना दिली असता तक्रारीचे निवारण करण्याकरीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष असिफजी खान व सचिव ऐड. कादर वडगामा यांनी भिवंडी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून व पत्र व्यवहार करून रस्त्याचे काम चालू करून घेतले व रस्त्याचे डांबरीकरणं करण्यात आले. त्यामुळे स्थानिक रहिवाशी यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे मन:पूर्वक आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here