वर्धा रेल्वे स्थानकावर रेल्वे पटरीतील वेल्डिंग उघडले; पुढील अनर्थ टळला.

✒आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒
वर्धा:- वर्धा रेल्वे स्थानकावर रेल्वे पटरीतील वेल्डिंग उघडले. त्यामुळे मुंबईकडे जाणारी गीतांजली फलाट क्रमांक 4 वरून गेली तर सिकंदराबाद हिंसार कोविड स्पेशल एक्स्प्रेसला अर्धा तास उभी होती. रेल्वे कर्मचाऱ्यांची सतर्कता दाखवत दुरुस्ती केली. ही घटना आज 2 रोजी सकाळी 8.15 वाजताच्या सुमारास लक्षात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्तर कक्षा पुढे फलाट क्रमांक 2 वर दोन रुळामध्ये असलेले वेल्डिंग उखडले. ही घटना लक्षत येताच कर्मचाऱ्यांनी ताबडतोप दुरुस्ती केली. दोन रुळामध्ये बऱ्याचदा अशी ग्याप पडत असते. आज सकाळी ही ग्याप रेल्वे कर्मचाऱ्यांना लक्षत येताच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे 02789 सिकंदराबाद हिंसार कोविड स्पेशल एक्स्प्रेस वर्धा रेल्वे स्थानकावर अर्धा तास उभी होती. 02260 ही मुंबईकडे जाणारी 8.50 वाजताची हावडा मुंबई गीतांजली एक्सप्रेस फलाट क्रमांक 2 वरून 4 वर वळवण्यात आली. दोन रुळांमध्ये पडलेल्या या ग्याप ला वेल्डिंग फॅक्चर म्हणतात. ही ग्याप 5 ते 6 सेंमीची असते. ही ग्याप रेल्वे स्थानक परिसरात घडल्याने प्रसंगावधन दाखवत तात्काळ लक्षत येताच दुरुस्ती सुरू करण्यात आली.