केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय यांच्यावतीने क्रीडापुरस्कारांसाठी अर्ज मागविले.

🖋️मनोज खोब्रागडे🖋️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
अकोला, दि.2(जिमाका):- केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय यांच्यावतीने क्रीडा क्षेत्रातील कामगिरींसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी पात्र व्यक्तिंकडून सन २०२१ साठी सोमवार दि.२१ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत परिपूर्ण अर्ज मागविण्यात आले आहेत. यात राजीव गांधी खेलरत्न, द्रोणाचार्य, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन , अर्जून, ध्यानचंद, मौलाना अबुल कलाम आझाद असे विविध प्रतिष्ठीत पुरस्कारांचा समावेश आहे. अर्जदारांनी आपले अर्ज थेट surendra.yadav@nic.in किंवा girish.kumar@nic.in या मेलवर पाठवावे. या पुरस्कारांबाबत सविस्तर माहिती व नियमावली तसेच अर्जाचा विहित नमुना https://yas.nic.in/sports या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.