जि.प.सदस्या सौ.प्रीती स.काकडे यांची कन्या वेदिका याच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना स्वयंपाक घरातील सामानाची किट व मास्क वाटप करण्यात आली.

हर्षल घोडे, राळेगाव तालुका प्रतिनिधी
राळेगाव:- भारतीय जनता पार्टीच्या वडकी वाढोणा गटाच्या जि. प. सदस्या सौ. प्रीती संजय काकडे यांची कन्या वेदिका संजय काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना स्वयंपाक घरातील सामानाची कीट व मास्क वाटप करण्यात आली.
यावेळी वडकी येथील सरपंच सौ मोनिका नागेश्यवर देठे, उपसरपंच शैलेश बेल्हेकर, माजी सरपंच श्री दिलीप कडू, बोरी येथील सरपंच सौ सिंधूताई वेले, उपसरपंच श्री गोपाल भोयर, पिंपळापुर येथील सरपंच रविभाऊ वसंतराव चौधरी, उपसरपंच किशोर नाहते, चांहाद लाडकी येथील सरपंच सौ रुपाली शंकरराव राऊत, खैरी येथील प्रतिष्ठित नागरिक शार्दुलजी जैस्वाल व विशाल पंढरपुरे उपस्थित होते.
तसेच बोरी येथील आशा सेविका पाझरे ताई यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रीती काकडे यांनी मुलीचा अठरा वर्षाचा जीवनप्रवास याची छोटीशी माहिती या कार्यक्रमात सांगितली. तसेच आमदार डॉ अशोक उईके माजी आदिवासी विकासमंत्री यांनी वाढदिवसाच्य शुभेच्छा दिल्या.