जोगेश्वरीतील इस्माईल युसुफ महाविद्यालयात नवीन इमारत व मुलींसाठी वसतिगृह उभारण्यासाठी निधीची आवशक्यतापर निवेदन पत्र

जोगेश्वरीतील इस्माईल युसुफ महाविद्यालयात नवीन इमारत व मुलींसाठी वसतिगृह उभारण्यासाठी निधीची आवशक्यतापर निवेदन पत्र

जोगेश्वरीतील इस्माईल युसुफ महाविद्यालयात नवीन इमारत व मुलींसाठी वसतिगृह उभारण्यासाठी निधीची आवशक्यतापर निवेदन पत्र

पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
मो.न.:- 8149734385

जोगेश्वरी :- इस्माईल युसुफ महाविद्यालय हे जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात राज्य शासनाच्या अखत्यारीतील एकमेव महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय , पदवी, पदव्युत्तर आणि पीएच. डी पर्येंतच्या शिक्षणाची व्यवस्था आहे. एकूण ०८ स्वयं अर्थसहाय्य अभ्यासक्रम सुरु असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून विज्ञान शाखेच्या सर्व विषयांत पदव्यूत्तर अभ्यासक्रम व संशोधन अभ्यासक्रम (पीएच. डी) सुरु करण्यात येणार आहे. या महाविद्यालयास ९० वर्षे पूर्ण होत असून येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ६००० च्या आसपास इतकी आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता त्यामुळे त्यांना अपुरी पडणारी जागा तसेच वर्ग वाढवण्याची आवश्यकता आहे.
महाविद्यालयातील विज्ञान विभागाच्या इमारतीमध्ये बऱ्याच ठिकाणी पडझड झाली असून ही इमारत धोकादायक स्थितीत आहे. या इमारतीच्या डागडुजीवर सातत्याने लाखो रुपये खर्च करण्यात येत असल्याने या ठिकाणी नवीन इमारत उभारण्याची आवशयकता आहे. या नव्या इमारतीत ग्रंथालय, वाचनालय कक्ष, ऑनलाईन स्पर्धा परीक्षा केंद्र, सेमिनार हॉल, नवीन विज्ञान पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रयोगशाळा व वर्ग खोल्या इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या नवीन इमारतींचे एस्टीमेट तयारही केले आहे.
याच महाविद्यालयात मुलींसाठी एक वसतिगृह बांधण्याचा मनोदय असून ती काळाची गरज असल्याने वसतिगृह बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. या सर्वांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्य करावे, असे निवेदन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती व्हावळ यांनी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांना दिले होते. त्यानुसार आमदार वायकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवून महाविद्यालयाने पाठविलेले हे दोन्ही प्रस्ताव मंजूर करण्याची पत्राद्वारे विनंती केली आहे.