गार्गी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत कंपाऊंड भिंतीवर वारली चित्रकला कार्यशाळेचे आयोजन संपन्न.

गार्गी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत कंपाऊंड भिंतीवर वारली चित्रकला कार्यशाळेचे आयोजन संपन्न.

गार्गी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत कंपाऊंड भिंतीवर वारली चित्रकला कार्यशाळेचे आयोजन संपन्न.

सचिन पवार माणगांव तालुका प्रतिनिधी ८०८००९२३०१

माणगांव : -‘”कला, साहित्य आणि निसर्ग यांचा संगम म्हणजे अभूतपूर्व आनंद प्राप्त करणे होय.”‘ – जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या  ङाॅ. वैशाली पाटील.रायगड़ जिल्ह्यातील पेण तालुक्यातील आंबेघर येथील गार्गी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत आज दिनांक २ जून रोजी गार्गी फाऊंडेशन च्या आंबेघर
वास्तू मधील कंपाऊंड भिंतीवर वारली चित्रकला कार्यशाळेचे आयोजन केले होते.

कोरोनाच्या दोन वर्षांपासून सुटका झाल्यानंतर सुटीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या युवक वर्गातील स्वयंसेवकां करीता गार्गी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत वारली चित्रकला
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या कविता निधी ठाकुर यांनी अंकुर ट्रस्ट, चाईल्ड हेवन या संस्थेच्या मुलांना व कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष हातात ब्रश देऊन संस्थेमार्फत नुकत्याच आंबेघर, पेण येथील वास्तू मधील कंपाऊंड भिंतीवर वारली चित्र काढुन रंगवायला शिकविले.

पेण खोपोली रोडवरील निसर्ग सौंदर्य व पावसाळी वातावरणातील हवेचा आनंद घेत लहान मोठ्यांनी वारली चित्रकलेचा आनंद घेतला.

“‘ जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यात स्वःनिर्मितीचा आनंद हा जेवढा आनंददायक असतो तेवढाच जगण्याच्या पध्दतीला आयाम देणारा असतो. ‘” असे उद्गगार जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या  ङाॅ.वैशाली पाटील यांनी काढले.

त्या गार्गी फाऊंडेशन या संस्थेमार्फत आयोजित वारली कला कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

या प्रसंगी द्रृकश्राव्य कम्युनिकेशन डिझायनर कविता निधी ठाकुर उपस्थित होत्या.

या मध्ये गार्गी पाटील, श्वेता देसाई, गौरी दळवी, मिनल सांडे, व्हेनानसिओ रॉड्रिग्ज यांनी सहभाग घेतला.

या कार्यशाळेत प्रकाश पाटील यांच्यासह सक्रिय सहभाग घेतलेल्या निराधार मुलांमधील सिद्धु सपकाळ आणि ज्ञानेश्वर चौधरी यांनी या प्रकारचे शिक्षण त्यांना भावी आयुष्यात उदरनिर्वाह करण्यास मदत करेल या बाबत विश्वास व्यक्त केला.

या वेळेस जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डाॅ. वैशाली पाटील यांनी स्वतः वेळ काढून वारली पेंटिंग करून कलेचा आनंद लुटला.