कोलाड-आंबेवाडी नाक्यावर बेकायदा मटका जुगार रोजरोसपणे सुरूच, पोलिसांकडून कोणतेही कारवाई नाही हप्त्याचा “प्रसाद” घेऊन पोलीसांना सुगीचे दिवस?
✍️सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301
रायगड :- कोलाड-आंबेवाडी नाका येथे बेकायदा मटका जुगार जोमाने सुरू असून पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यावर पोलीस कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे.कोलाड येथे आर.डी.सी.सी. बँकेच्या पाठीमागे मटका जुगार, तसेच आंबेवाडी नाका सर्व्हिस रोड येथे देशी दारूच्या दुकानाच्या बाजूला मटका जुगार आणि चिमणी पाखरं असे दोन ठिकाणी मटका जुगाराचे बेकायदा धंदे सुरू असून या अवैध धंद्यांकडून हप्त्याचा “प्रसाद” घेण्यासाठी दर महिन्याला येथे एका पोलीसाची ये-जा सुरू असते.
या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तरूण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात मटका खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या बेकायदा मटका जुगारामुळे महिला वर्गातून देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे.मागील महिन्यात वृत्तपत्रानुसार प्रसिद्धी दिली होती परंतु कोलाड पोलिसांनी कोणतेही कारवाई नं करता अवैध धंदे चालूच ठेवले आहेत तरी महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि रायगड पोलीस अधीक्षक यांनी तातडीने या गंभीर समस्येची दखल घेऊन येथील मटका जुगाराविरूद्ध कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.
हे आपण वाचलंत का?
- पुन्हा एकदा नोटबंदी होणार…आरबीआयने केले जाहीर
- निसर्गातील आश्चर्ये: चीनमधील हे स्वर्गाचे प्रवेशद्वार आपण पाहिलेत का?