माणगांव तालुक्यात होणारे अपघात रोखण्यासाठी कोणती उपाययोजना राबवावी ? माणगांव पोलीस ठाण्यात आढावा बैठक.

सचिन पवार 
रायगड ब्युरो चीफ
📞: 8080092301

माणगांव :-आज दि.२४ मे रोजी माणगांव पोलीस ठाणे येथे माणगांव तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी होणारे अपघात याच्यावर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमात पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण येथील मोटार वाहन निरीक्षक मुबारक उचगावकर,सह मोटार वाहन निरीक्षक नंदन राऊत,माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील सहायका उप प्रादेशिक परिवहन निरीक्षक मंगेश चौधरी,सहाय्यक कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालय महाड येथील रवींद्र भोये, माणगांव नगरपंचायत चे मुख्याधिकारी संतोष माळी, रेसिडेन्सी इंजिनिअर एम.श्रीनिवास, रेसिडेन्सी इंजिनियर संजय कुमार ,चेतक एन्टरप्रायजेस चे प्रतिनिधी प्रमोद डावरे याकार्यक्रमात उपस्थित होते.

माणगांव तालुक्यात होणारे अपघात कसे रोखता येणार यावर चर्चा करण्यात आली. प्रथमतः पेण उपप्रादेशिक परिवहन चे अधिकारी यांनी अपघात क्षेत्रावर जाऊन सर्वे केले यावेळी उपप्रादेशिक कार्यालय पेण चे मोटार वाहन निरीक्षक मुबारक उचगावकर यांनी अपघाताचे वितरण, स्थळें,पावरपॉईंट, रब्बर, ब्लॅक स्पॉट, करण्याचे तात्काळ उपाययोजना यांचे सादरीकरण केले. 

माणगांव तालुक्यातील हायवे क्रमांक ६६ वर भुवन, रातवड, धरणाचीवाडी, इंदापूर, कशेने, विघवली, तिलोरे, खरवलीफाटा, कलमजे फाटा, नाणोरे रेल्वे स्टेशनं,माणगांव बाजारपेठ ढालघर फाटा, मुगवली, तळेगाव, रेपोली, लोणेरे, वडपाळे, मोर्बा रोड, सुर्ले बोर्ले, विळे भागाड, तासगाव,ताम्हिणीघाट,अशे अनेक अपघात प्रवण क्षेत्र आहेत दैनंदिन होणारे अपघात रोखण्यासाठी त्यावरील तात्पुरते व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तालुक्याच्या सर्व अधिकारी याच्यासमोर अपघात प्रवण समीकरण सादर केले व याबाबत चर्चा करण्यात आली.

माणगांव तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी अपघात होत आहेत त्या त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर,रब्बर स्ट्रीप,ब्रेकर्स, सिन बोर्ड,फलक, सिंग्नल, असे लावून होणारे दैनंदिन अपघात रोखता येईल त्याच प्रमाणे इंदापूर बायपास, व माणगांव बायपास लवकरात लवकर करावे असे ही सांगण्यात आले उपप्रादेशिक परिवहनचे मोटार वाहन निरीक्षक मुबारक उचगावकर व त्याचे सहकारी यांनी सर्वे केले असता माणगांव तालुक्यात एकूण २० अपघात प्रवण क्षेत्र आढळून आले त्यामध्ये ४ ब्लॅक स्पॉट व १६ संभाव्य अपघाताची क्षेत्र आढळून आली यावरती एन एच आय चे कॉन्ट्रॅक्टधर, नगरपरिषद अधिकारी,पी ओ डी,अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या व दैनंदिन होणारे अपघात यावरती उपाययोजना राबवून कामे लवकरात लवकर पूर्ण करावे असे सांगण्यात आले.

हे आपण वाचलंत का?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here