माणगांव तालुक्यातील सुर्ले आदिवासीवाडी येथे गावठी हातभट्टी दारुवर माणगांव पोलिसाची बेधडक कारवाई…

सचिन पवार 
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301

माणगांव :-माणगांव तालुक्यात चार ते पाच दिवसापूर्वी माणगांव पोलिसांनी हातभट्टी दारुवर पोलिसांनी छापा टाकला होता. त्याच्यात त्यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून गूळ नवसागर मिश्रितसह आरोपी एक, दोन आणि तीन यांना ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली होती. यांच उद्देशाला अनुसरून २२ मे रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सुर्ले आदिवासी येथे नदीकिनारी गूळ नवसागर मिश्रित गावठी हातभट्टी दारू एक सफेद रंगाचा प्लास्टिक कॅन त्याच्यात १० लिटर हातभट्टीची तयार दारू प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे पाडताना आढळून आले.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की फिर्यादी मयुर जनार्दन पाटील वय वर्ष २७ रा.माणगांव व्यवसाय माणगांव पोलीस शिपाई यांनी सुर्ले आदिवासीवाडी येथे होणाऱ्या अवैरीधित्या गावठी दारूचा पर्दापास करीत माणगांव पोलीस ठाण्यात खबर देताच माणगांव पोलीस ठाण्याचे माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली आरोपी रामचंद्र अर्जुन पवार वय वर्ष ५२ रा. सुर्ले आदिवासीवाडी ता. माणगांव याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कॉ. गु. रजि. नं १५९/२०२३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माणगांव पोलीस सब इन्स्पेक्टर भोजकर, पो. हवालदार कोजे, पोलीस हवालदार रामनाथ डोईफोडे, पो. हवालदार कोळेकर, पो. हवालदार संमेल हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here