कबड्डी आणि पंगा हे कापसाचे वाण शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध करा – आ. किशोर जोरगेवार. जिल्हाधिकारी यांची भेट घेत केली मागणी

55

कबड्डी आणि पंगा हे कापसाचे वाण शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध करा – आ. किशोर जोरगेवार. जिल्हाधिकारी यांची भेट घेत केली मागणी

अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो:8830857351

चंद्रपूर,2 जून: कबड्डी आणि पंगा हे कापसाचे वाण एका दिवसात बाजारपेठेतुन बेपत्ता झाले असुन 800 रुपये प्रति बोरीचे हे वाण 1300 ते 1400 रुपयात शेतक-यांना विकल्या जात असल्याचा प्रकार आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या लक्षात आणून दिला असुन या या साठेबाजीवर आळा घालुन कबड्डी आणि पंगा हे कापसाचे वाण शेतक-यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. शुक्रवारी 2 जून रोजी आ. जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. यावेळी मतदार संघातील विविध विषयांवरही आ. जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याशी चर्चा केली. 

चंद्रपूरात कपासीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. पावसाळी हंगाम सुरु झाल्याने शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. कापूस उत्पादक शेतक-यांनी कबड्डी आणी पंगा या कापसाच्या वाणाला पसंती दिली आहे. 1 जूनपासून हे वाण प्रकार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. मात्र काही तासातच हे वाण प्रकार बाजारपेठेतून गायब झाल्याचे समोर आले असुन हे वाण संपले असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. हा प्रकार चिंताजनक असुन मोठी साठेबाजी होण्याची शक्यता वर्तवीली जात आहे. 800 रुपये प्रति बोरी प्रमाणे मिळणारे हे वाण 1300 ते 1400 रुपये अशा महागड्या भावाने शेतक-यांना विकल्या जात असल्याने शेतक-यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या प्रकारामुळे शेतक-यांमध्येही मोठा रोष निर्माण झाला असल्याचे आ. जोरगेवार यांनी म्हटले. 

दरम्यान शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेत सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. मागणी असलेले कबड्डी आणि पंगा हे वाण मुबलक प्रमाणात उपलब्ध करावे अशी मागणीही यावेळी आ. जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना केली. जिल्हाधिकारी यांनीही याची तात्काळ दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे म्हटले आहे.

हे आपण वाचलंत का?