पाणी प्रश्न पेटणार आहे?

अंकुश शिंगाडे

मो: ९३७३३५९४५०

पाणी हे जीवन आहे. पाणी जर मिळाले नाही तर आपल्याला लवकरच गुदमरल्यासारखं वाटते. म्हणून पाण्याचा वापर काटकसरीनं करावा. काही लोकं पाणी पितात. परंतू पाणी पितांना ते अर्धा पितात. उरलेलं पाणी फेकून देतात. परंतू तसं फेकणं बरोबर नाही.

पाणी कुठून मिळतं? असा जर विचार केला तर आपण सहजच म्हणतो की पाणी विहिरीतून मिळतं. कोणी नळातून तर कोणी बोरवेलमधून पाणी मिळत असतं असंही सांगतील. परंतू पाणी हे जमीनीतून मिळत असतं. पावसाचं जमीनीत मुरलेलं पाणी झ-यांच्या रुपात विहिरीतून आपल्याला मिळवून घेता येतं. कधी पाणी नदीतूनही मिळवता येतं. परंतू अलीकडं पाणी संकटच निर्माण झालेले असून आता पाणी प्रश्न पेटलेला आहे. आता ब-याचशा विहिरी खोदल्या जातात. कुपनलिका अर्थात बोरवेल खोदल्या जातात. परंतू पाणीच लागत नाही. कारण आता ना पाऊस पडतो. ना तो पाऊस जमीनीत मुरत. ना ते पाणी झ-यांच्या रुपात विहिरीत येत ना नदीत. आज तसं पाहता विहिरीच नाही तर नद्याच्या नद्या सुखलेल्या आहेत. त्याचं कारण काय असावं याचा आपण कधी विचारच करीत नाही.

 

आपण केरकचरा, सांडपाणी नदीत टाकतो. आपण शोषखड्डा खोदत नाही. त्यातच आपल्याला वाटतं की कोण अशी मेहनत करेल. कोण खड्डा खोदेल. त्यातच असं सांडपाणी जमीनीत सोडा, नदीत वा तलावात सोडल्यानं, नदीत किंवा तलावात जे प्राणी नदीचं किंवा तलावाचं पाणी शुद्ध करणारे असतात. ते जलचर आधी मरतात. कारण अशा सांडपाण्यात विषारी वायू जास्त प्रमाणात प्रवाहित होतात. त्यामुळंच अशा जलचरांना श्वासच घेता येत नाही. त्यामुळं नदीचं वा तलावातील पाणी शुद्ध होत नाही. त्यातच त्या पाण्याची लवकरच वाफ होते व ते पाणी लवकर नष्ट होते. म्हणून आता पृथ्वीवर पाणी सापडत नाही.

आता लवकर वाफ होते असं म्हटल्यास आतिशयोक्ती वाटेल. याबाबत एक उदाहरण सांगता येईल. आपण एखाद्या चुनखडीवर वा फॉस्फरसवर पाणी टाकल्यास काय दिसते? त्याचं पाणी बनतांना दिसत नाही तर ती वाफ होतांना दिसते. याचाच अर्थ असा की नदीच्याही पाण्याची लवकर वाफ होत असावी व ते पाणी निसर्गात जात असावे हे बरोबर की नाही. कारण नदीच्या पाण्यात माणूस अस्थीविसर्जन करीत असल्यानं जास्तीत जास्त फॉस्फरस नदीत मिसळतो व तोच फॉस्फरस जास्तीत जास्त पाण्याची लवकरात लवकर वाफ बनवीत असतो. म्हणूनच नद्यांमध्ये आता पाणी सापडत नाही. त्या शुष्क होतांना दिसत आहेत. आता कोणी म्हणणार की पाण्याचीच वाफ होते ना, मग ती वाफ वर जाईल. थंड होईल व पावसाच्या स्वरुपात खाली येईल. मग खालच्या पाण्याची पातळी जैसे थे. परंतू असं होत नाही. ते वाफेच्या स्वरुपात निसर्गात मिसळलेले पाणी सदृश व इतर वायू हवेतील ऑक्सिजन व इतर वायूंशी संयोग पावतात व ते विनाशकारी वायुमध्ये रुपांतरीत होतात. ज्या वायूतून पाणी बनत नाही. ते वायूचे वायूच राहतात. ज्याचा ओझोनच्या स्तराशी धोका होतो. (ऑक्सिजनची जाड परत) ओझोनची परत अर्थात स्तर पातळ होत असतं.

हे आपण वाचलंत का?

 

महत्वपुर्ण गोष्ट ही की ओझोनचा थर कमी झाल्यानं वा पातळ झाल्यानं सुर्याचे जास्तीत जास्त किरणं पृथ्वीवर येतात. त्याला ओझोन परत अडविण्यास सक्षम ठरत नाही. हे सुर्याचे किरण पुन्हा जमीनीतील पाण्याची वाफ तर करतात. परंतू वर गेलेले वाफ दृश्य पाणी, त्या पाण्याचे रुपांतर इतर वायूत होत असल्यानं ते परत थंड होवून जमीनीवर येत नाहीत. याचाच अर्थ असा की आताच्या काळात पृथ्वीवर पाणी प्रश्न पेटला आहे.

आपण विचार करायला हवा की पुर्वी जमीनीवर किती मुबलक प्रमाणात पाणी असायचं. याचं कारण काय? तर पाण्याचं शुद्धीकरण. पाण्यात पुर्वी आपण सांडपाणी मिसळवीत नव्हतो. प्रत्येकाच्या घरी शोषखड्डे खोदलेले राहायचे. ते सांडपाणी शोषखड्ड्यात मुरायचं. जास्त प्रमाणात ते सांडपाणी नदीत मिसळायचं नाही. तसंच मेलेली प्रेतही माणसं जास्त जाळायचे नाहीत. ती प्रेतं जमीनीत गाडली जायची. त्यामुळंच नदीच्या पाण्यात जास्त प्रमाणात फॉस्फरस मिसळत नव्हता व जास्त प्रमाणात वाफेच्या रुपात फॉस्फरस वातावरणातही मिसळत नव्हता. त्यामुळंच साहजीकच शुद्ध वाफ वातावरणात मिसळायची. ज्याचा संयोग हवेतील ऑक्सिजनची होवून त्यातून H/2O म्हणजेच पाणी निर्माण व्हायचं. जे थंड होवून जमीनीवर यायचं. तसंच पाण्यात वेगवेगळे जलचरही असायचे की जे पाणी शुद्ध ठेवायचे. अशा पाण्याची सुर्याच्या उष्णतेनं वाफ झालीच तर त्या वाफेतूनही तोच पाणी निर्माण करण्याचा प्रकार.

आज पाणी प्रश्न पेटला आहे. कारण आपण केलेलं सिमेंटीकरण. आज पाणी जमीनीत मुरायला जागाच नाही. शिवाय आपलं सांडपाणी शोषखड्ड्यात न मुरता सरळ सरळ नदीत जातं. त्यातून नदी प्रदुषीत होते व तिच्यात पुरेसं कालांतरानं पाणी दिसत नाही.

महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्याला जर वाटत असेल की नदीत पाणी दिसावं तर आपण एक उपाय करुन पाहावा काही वर्ष तरी. प्रायोगीक तत्वावर. नदी प्रदुषीत करु नये. नद्यांचं शुद्धीकरण करावं. तिच्यात सांडपाणी टाकू नये. कारण तिच्यात सांडपाणी गेल्यानं तिचा श्वास गुदमरेल. तिची हत्या होईल आणि तिच्याच हत्येनंतर सा-यांचीच हत्या होईल. पाणी प्रश्न पेटेल. मग सारेच प्रश्न पेटतील. अन्नधान्य पिकणार नाही. पशूपक्षी दिसणार नाही. मग मानवही काळाच्या ओघात डायनासोरसारखा नष्ट होईल यात शंका नाही. मग सा-याच नद्यांचं अस्तित्व संपेल सरस्वती नदीसारखं. आपण दिसावं, नद्या दिसाव्या, पशूपक्षी दिसावे ही सृष्टी दिसावी. गाय दिसावी. तिचं लेकरु दिसावं वा प्रत्येक जीवजंतूंची माय दिसावी व त्या प्रत्येक जीवजंतूचं बाळ दिसावं यासाठी आपण नद्याच नाही तर वातावरणही शुद्ध ठेवावं. नद्याही शुद्ध ठेवाव्यात. म्हणजेच पाणी शुद्ध राहील. प्रत्येकाला पाणी मुबलक मिळेल व पाणी प्रश्न पेटणार नाही हे तेवढंच सत्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here