बेलोशी येथेकृषी सेवा केंद्र आणि औजार बँक चे उद्घाटन

बेलोशी येथेकृषी सेवा केंद्र आणि औजार बँक चे उद्घाटन

पाच ग्रामसंघाना पॉवर टीलर वितरित

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद )अंतर्गत दिनांक 2 जून 2025 रोजी सक्षम महिला प्रभाग संघ प्रभाग बेलोशी मार्फत संचलित कृषी औजार बँक चे गणेशपूजन प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ. कल्पिता कपिल शिंदे यांच्या हस्ते आणि नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभाग संघाचे कृषी सेवा केंद्र आणि औजार बँक यांचे उद्घाटन मा. प्रकल्प संचालक श्रीमती प्रियदर्शनी मोरे मॅडम यांच्या हस्ते पार पडले. या वेळी प्रभागातील पाच ग्रामसंघाना पॉवर टीलर वितरित करण्यात आले.या मंगल समयी कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद रायगड श्री. पवनकुमार साहेब यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. तालुका कृषी अधिकारी श्री घरत सर , जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाकडून श्री. शिरीष पाटील व श्रीम. सुजाता पाटील मॅडम सामाजिक कार्यकर्ते श्री प्रतीक खारकर, तालुका अभियान व्यवस्थापक श्रीम. रिद्धी आवले , IBCB श्रीम. रीया पाटील, प्रभाग समन्वयक श्री. साईनाथ पाटील, बेलोशी प्रभाग संघातील सर्व पदाधिकारी, प्रभागातील सर्व CRP उपस्थित होत्या.