12 ते 15 दिवसापासून विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे .

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
कारंजा (घा )02/07/2021
परिसरात मृग नक्षत्राच्या सुरुवाती पासून सतत कोसळणाऱ्या पावसाने मागील 12 ते 15 दिवसापासून विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे . जर येता दोन ते तीन दिवसामध्ये पाऊस पडला नाही तर कदाचित सोयाबिन आणखी उशिरा पेरलेल्या कपाशी पिकांचे मोठे नुकसान होणारं असून काही शेतकऱ्यांवर दुप्पट पेरणीचे संकट सुद्धा कोसळणाऱ्याची चिन्हे आहेत. यावर्षी पाऊस सरासरी एवढा पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता . त्यानुसार सुरुवातीलाच मृग नक्षत्र सुरु झाल्यानंतर पावसाळा सुरुवात झाली. जवळपास पंधरा दिवस पाऊस चांगला पडला . शेतकरीही आनंदी झालेत . सर्वांची पेरणी झाली . अनेकांची पिके बहरली सुध्दा . काहींनी तर डवरणे आटोपलीत आणि पुन्हा पाऊस येईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी तरळायला लागले . चांगली बसलेली शेती मेहनत वाया जाण्याच्या मार्गावर असून जर पुढील तीन ते चार दिवसामध्ये पाऊस पडला नाही तर अनेक शेतकऱ्यांवर परत पेरणीचे संकट कोसळण्याची चिन्हे दिसू लागली आहे.