नागपुरात संतापजनक घटना: पतीच्या परवानगीने दिराने केला वहिनीवर बलात्कार.
नागपुरात संतापजनक घटना: पतीच्या परवानगीने दिराने केला वहिनीवर बलात्कार.

नागपुरात संतापजनक घटना: पतीच्या परवानगीने दिराने केला वहिनीवर बलात्कार.

नागपुरात संतापजनक घटना: पतीच्या परवानगीने दिराने केला वहिनीवर बलात्कार.
नागपुरात संतापजनक घटना: पतीच्या परवानगीने दिराने केला वहिनीवर बलात्कार.

युवराज मेश्राम,

नागपुर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर,दि.2 जुलै:- नागपुर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. नागपुरातील परीवाराने एकाच घरातील दोन बहिणींशी लग्न केल्यानंतर वडिलांच्या संपत्तीतील मुलीनी वाटा न मागितल्यामुळे सासरच्यांनी हुंड्यासाठी मोठ्या प्रमाणात छळ सुरु केला. आणि या त्रास व छळाची परीभाषा गाठत स्वता:च्या नराधम दिराने वहिनीवर कुटुंबीयांच्या परवानगीने बलात्कार केला. ही संतापदायक घटना नागपुर येथील एमआयडीसी परिसरात समोर आली. याप्रकरणी नराधम पती, दिरासह नऊ व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनकडुन प्राप्त माहितीनुसार, दिलीप आणि दीपक हे दोघे भावंडे नागपुरातील सीआरपीएफ गेट एमआयडीसी परिसरात राहतात. दोघेही भाऊ तापीट रागीष्ट प्रवृत्तीचे असल्यामुळे घरा शेजाऱ्यांसोबत या परिवाराचे पटत नव्हते. फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये दिलीप आणि दीपक या भावंडांनी दवलामेटी परिसरात राहणाऱ्या उच्चशिक्षित दोघ्या बहिणींसोबत विवाह केला. मुलीचे वडील दुधाचा विक्रीचा व्यवसाय करीत असल्यालमुळे परिवाराची आर्थिक स्थिती हलाखीची होती. विवाहाच्या 15 दिवसानंतर दिलीप आणि दीपक यांनी दोघांनीही आपल्या पत्नीला तुझा बापाकडुन विवाहात काहीच मिळाले नाही. त्यामुळे तुम्ही माहेरून हुंडा आणण्यासाठी तगादा लावला. आणि छळ करायला सुरवात झली. मात्र, दोघींनीही माहेरून पैसे आणण्यासाठी नकार दिला. त्यामुळे दीपक आणि दिलीप यांनी दोघ्याही बहिणींना कमरेला लावणा-या पट्ट्याने जबर प्रमाणात मारहाण केली. त्यानंतर सासू आणि दोन ननंदनेही त्यांना घरात मोलकरणीसारखी वागणूक दिली.

मोठ्या बहिणीने पतीचा मार सहन केला. परंतु, लहान बहीण सारखी रडत राहत होती. दोघींनाही माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार मारझोड होत होती. परंतु, त्या पैसे आणण्यास नकार देत होत्या. त्यामुळे सासरचे लोक दोघींनाही मानसिक व शारीरिक त्रास देत होते. एवढेच नव्हे तर दोघींनीही माहेरी जाण्यास नकार देत असल्यामुळे दोघींचेही पती दीपक आणि दिलीप त्यांच्यावर लैंगिक अत्याचारही करीत होते, असे दोघ्या बहिणीनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

3 फेब्रुवारी 2021 रोजी मोठी बहीण घरात झोपली होती. त्यावेळी दीर घरात आला. त्याने वहिनीशी अश्लील चाळे केले. त्यामुळे ती ओरडली आणि रूमबाहेर आली. त्यावेळी पती, सासू आणि दोन ननंदने तिला दिराशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. तिने नकार देताच दोरीने हात बांधून दिरासोबत रूममध्ये बंद केले. दिराने तिच्यावर पाशवी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here