उल्हासनगर वाहतूक विभागाच्या हवालदाराला 500 रुपयांची लाच घेतांना अटक, गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई.

नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी ✒
Mob – 9136879930
मुंबई/उल्हासनगर,दि.2 जुलै:- मुंबईच्या उपनगर उल्हासनगर खळबळजनक बातमी समोर आली आहे. भारत गॅस एजन्सीच्या रिक्षा चालकाकडून 500 रुपयांची लाच घेणाऱ्या उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी वाहतूक विभागात हवालदार म्हणून कार्यारत असलेले गणेश चौधरी याला गुन्हे अन्वेषण विभागाने गुरूवारी दुपारी लाच घेताना रंगेहात अटक केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर कॅम्प नं-4 विठ्ठलवाडी वाहतूक विभागाचे हवालदार म्हणून कार्यरत असलेले गणेश दयाराम चौधरी यांनी भारत गॅस एजन्सीचे रिक्षा चालक यांना गॅस वाहतूक करण्यासाठी दरमहा 700 रुपयांची मागणी केली. रिक्षा चालकांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केल्यावर, गुन्हे अन्वेषण विभागाने यशवंत विद्यालय परिसरात गुरुवारी दुपारी सापळा रचला.
700 ऐवजी तोडजोड अंती 500 रुपये घेताना वाहतूक हवालदार चौधरी यांना रंगेहात अटक केली. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक सुषमा पाटील, पोलीस हवालदार परदेशी यांच्यासह पथकाने कारवाई केली असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here