आदिपुरूष चित्रपटामध्ये रामायणाची चुकीच्या पद्धतीने मांडणी

रमेश कृष्णराव लांजेवार 

मो: 9921690779

बिग बजेट आणि तगडी स्टारकास्ट असलेला आदिपुरूष चित्रपट दिनांक 16 जूनला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला तेव्हा पासून लोकांमध्ये रोष व निराशा असल्याचे दिसून आले.कारण यातील सर्वच पात्र व चित्रिकरण रामायण मालिकेच्या किंवा रामायणाच्या अनेक चित्रपटाच्या विपरीत असल्याचे दिसून येते.देशात अनेक भाषा आहेत त्या पध्दतीने वेगवेगळ्या भाषेत आपल्याला वेगवेगळे पात्र रामायणाच्या माध्यमातून दिसून येते व हुबेहूब रामायणाचे चित्रिकरण केल्या जाते आणि लोक सुध्दा प्रतिसाद देतात.परंतु आदिपुरूष चित्रपटाने रामायणातील संपूर्ण सीमा ओलांडून देशवासियांच्या भावनांशी खेळ केला आहे.त्यामुळे श्रध्दास्थानाचा मोठा अपमान होत आहे.

आदिपुरूष हा रामायणावर आधारित नसुन कार्टून चित्रपट असल्याचे दिसून येते.कारण रामायणातील प्रत्येक पात्रांनी अत्यंत संवेदनशीलतेने कार्य केले.त्यात राम, सीता,लक्ष्मन, हनुमान, रावण,बिबीशन, कुंभकर्ण,मेघनाथ इत्यादी अनेक पात्रांनी हुबेहूब चित्रिकरण करून लोकांची मने जिंकली व संपूर्ण आनंद घेतला.तेव्हाच प्रत्येकाच्या हृदयात आजही हुबेहूब जुन्या रामायणाची कल्पना सामोरं रहाते व सत्य युगाची कल्पना साकार होते.परंतु आदिपुरूष चित्रपटांमध्ये रामायणातील एकाही पात्रांची बरोबरी केलेली नाही.उलट आदिपुरूष चित्रपटाच्या निमित्ताने रामायण मालिकेची निंदा केल्याचे दिसून येते.आदिपुरूष चित्रपटावर अनेक वादंग झाले.यानंतर निर्मात्यांनी काही डायलॉग कट केल्यात.परंतु आदिपुरूष हा चित्रपट मुळातच रामायणाच्या विपरीत बनलेला आहे. त्यामुळे या चित्रपटावरच बंदी घालायला हवी. कारण अशा चित्रपटांनी धार्मिक भावना दुखावतात.

आदिपुरूष चित्रपटावर बंदी घालण्याच्या याचिकेवर दिनांक 28 जून 2023 रोज बुधवारला आदिपुरूष या चित्रपटामध्ये रामायणातील व्यक्तिरेखांची मांडणी अत्यंत लज्जास्पद पध्दतीने करण्यात आली आहे अशा शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने निर्मात्यांवर ताशेरे ओढले व निर्मात्यांची तीव्र शब्दांत कानउघाडणी केली.त्यामुळे कोणताही चित्रपट काढतांना फक्त पैसा कमविण्याचा उद्देश न ठेवता लोकांच्या भावनांकडे सुध्दा लक्ष देण्याची गरज आहे. कोणताही चित्रपट काढतांना रामायण, कुराण, बायबल, ग्रंथ किंवा इतर ग्रंथ यांचा पुर्णपणे अभ्यास करूनच चित्रपट बनविला पाहिजे.त्याचप्रमाणे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी.कारण भारतात अनेक धर्माचे व पंथाचे लोक रहातात याची भान चित्रपट निर्मात्यांने ठेवायला पाहिजे. आदिपुरूष चित्रपटामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे की अशा प्रकारचे चित्रपट तयार करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्वे आखून देण्याची गरज आहे.धार्मिक विषयावर चित्रपट तयार करताना एखादा धर्म किंवा समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत.

आदिपुरूष चित्रपट चुकीच्या पद्धतीने प्रसारीत केलेला आहे.संपुर्ण भारतवर्ष जाणते की रावणाची लंका सोन्याची होती. परंतु ओम राऊतनी आदिपुरूष चित्रपटाला रामायणाकडे न नेता पाश्चिमात्य पध्दतीकडे नेवुन मॉडर्न रावण दाखवून रावणाची लंका कोळशाच्या खाणीप्रमाणे काळ्या रंगाची दाखविली आहे, रामायणात मध्ये माता सीता वनवासात असताना गेरू रंगाची साडी परिधान केली होती मात्र यात पांढऱ्या रंगाची साडी परिधान केलेले दाखविले आहे, ग्रंथ पुराणांमध्ये रावण सीतेचे हरण करतांना पुष्पक विमानातून लंकेला घेऊन जातो.परंतु आदिपुरूषमध्ये रावण माता सीतेला काळ्या रंगाच्या चामगाधडवर घेऊन जातो.रामायणामध्ये आपण सर्वांनीच पादुका पहिल्या परंतु आदिपुरूषमध्ये रामाच्या पायात सॅंडल दिसून येते.

रामायणामध्ये रावणाला मुकुटधारी दहातोंड असायची, परंतु आदिपुरूषमध्ये अजब प्रकारची दहातोंड दाखविली आहे.त्याचप्रमाणे वानरसेना सुध्दा आक्राळविक्राळ स्वरूपाची दाखविण्यात आली आहे.म्हणजेच संपूर्ण पात्रांचा रामायणाशी कुठेही तालमेल होतांना दिसत नाही. रामायण सीरिजमध्ये हनुमानजी सीता मातेला प्रणाम करतात, परंतु आदिपुरूषमध्ये हनुमानजी छातीवर हात ठेवून मुजरा करतात.ग्रंथ-पुराणामध्ये असे कुठेही लिहिले नाही की रावण मसाज करण्याकरीता अजगरांसोबत बसत होता.परंतु ओम राऊत नी सिनेमैटिक लिबर्टीच्या अंतर्गत सैफ अली खानला अजगराच्या सोबत बसलेला दाखविला आहे.यावरून स्पष्ट होते की आदिपुरूष चित्रपटाने रामायण सीरियल, ग्रंथ-पुराण याला तोडमरोड करून व धार्मिक भावना दुखावुन फक्त पैसा कमविण्यासाठी बनविलेला आहे व ओम राऊत ने हिंदू धर्माच्या विपरीत आदिपुरूषचे चित्रिकरण केले आहे.

त्याचप्रमाणे या चित्रपटात संपूर्ण डायलॉग रामायणाच्या विपरीत आहे व त्याचा रामायणाशी काहीही संबंध दिसून येत नाही.यामुळे प्रेक्षकांच्या मनात आदिपुरूष हा चित्रपट खटकत आहे.यावरूनच अलाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने निर्मात्यांवर ताशेरे ओढले आहेत.त्यामुळे आदिपुरूष चित्रपटावर पुर्णतः बंदी येणे अत्यंत गरजेचे आहे.जय श्री राम!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here